उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये लांडग्यांची दहशत कायम, 5 वर्षीय मुलीवर हल्ला

बहराइच : यूपीच्या बहराइचमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सॊमवारी रात्री एका 5 वर्षाच्या मुलीवर लांडग्याने हल्ला केला, त्यात मुलगी जखमी झाली. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच बहराइचमध्ये वनविभागाने चार लांडगे पकडल्याची बातमी समोर आली होती, पण अजून लांडग्यांची दहशत काही कमी होत नाहीये. बहराइचमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. 35 पेक्षा अधिक गावांमध्ये लांडग्यांच्या भीतीने लोक शांतपणे झोपू शकत नाहीत. तसेच गावात सुमारे डझनभर लांडगे फिरत असल्याचा लोकांचा दावा आहे. पण, वनविभाग त्यांची संख्या तीनवर टाकत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी वनविभागाने बहराइचच्या कुलैला गावातून एका लांडग्याला पकडले होते. यामुळे लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत. दुसऱ्याच दिवशी सीतापूरमध्ये सहा जणांवर हल्ला  झाला. लोक म्हणतात की एक लांडगा एका रात्रीत सहा लोकांवर हल्ला करू शकत नाही. नक्कीच जास्त लांडगे आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बहराइचमधील ऑपरेशन भेडियावर लक्ष ठेवून आहेत. तसेच त्यांच्या सूचनेवरून वन आणि पर्यावरण मंत्री डॉ.अरुणकुमार सक्सेना बुधवारी बहराईचला पोहोचले. वनमंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. येथील अनेक गावात पोहोचून वनविभागाची टीम सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी आणि लांडग्यांना पकडण्यासाठी तत्परतेने काम करत असल्याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source