BMC शिवाजी पार्कचे भाडे वाढणार?

दादरमधील शिवाजी पार्क मैदान राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांसाठी विशेषकरून ओळखले जाते. या मैदानासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, अन्य सभा यांसाठी दिवसाला 250 रुपये एवढे नाममात्र शुल्क मुंबई महापालिकेकडून आकारले जाते. या शुल्कात वाढ करण्यासाठी मुंबई महापालिकेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.  यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाने महापालिकेच्या मालमत्ता विभागाशी ऑगस्टमध्ये पत्रव्यवहार केला आहे. भाडेवाढीबाबत योग्य ते धोरणही निश्चित करण्यात यावे, असेही पत्रात नमूद केले आहे. शिवाजी पार्क मैदानात अनेक खेळपट्ट्या असून क्रिकेटचा सराव आणि सामने होतात. फेरफटका मारण्यासाठीही अनेक जण पार्कात येतात. हे मैदान नेहमीच राजकीय सभांचे साक्षीदार राहिले आहे. येथे सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. सभांसाठी भल्या मोठ्या आकाराचे स्टेज उभारण्यासाठी मैदान खणले जाते. झेंडे, मोठे स्क्रीन बसवण्यासाठी बांबू लावण्यात येतात. कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांचीही सोय केली जाते. सभा होताच स्टेजसह सर्व साहित्य आयोजकांकडून नेण्यात येते. मात्र अनेकदा अशा सभांमुळे मैदानाची अवस्था खराब होते. या मैदानावर राजकीय पक्ष किंवा आयोजकांकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. हीच स्थिती धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतरही दिसून येते. सध्या राजकीय सभा, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शिवाजी पार्क मैदानातील जागा देताना मुंबई महापालिका दिवसाला अवघे 250 रुपये शुल्क अधिक जीएसटी एवढी रक्कम आकारते आणि 20 हजार रुपये अनामत रक्कम घेते. अत्यल्प शुल्क आणि डिपॉझिट पाहता, ते वाढवण्याचा विचार केला जात आहे. प्रस्तावित भाडेवाढीबाबत योग्य ते धोरण निश्चित करावे, असेही जी विभागाने पत्रात नमूद केले आहे. याआधीही शिवाजी पार्क मैदानाचे शुल्क वाढवण्याबाबत विचार झाला होता. मात्र नंतर तो मागे पडला. जी उत्तर विभागाने महापालिका मालमत्ता विभागाला दिलेल्या पत्रात याचाही उल्लेख केला आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक अनामत रक्कम आकारण्यासंदर्भातही विचार आहे. सभा किंवा कार्यक्रमांनंतर मैदानाच्या होणाऱ्या दुरवस्थेची वसुली काहीवेळा आयोजकांकडून अनामत रकमेमधूनच केली जाते. मात्र ती अत्यल्पच असते. गेली अनेक वर्षे कमी असलेल्या शुल्कामुळे यामध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे.हेही वाचा मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना : नोंदणीची अंतिम मुदत वाढवलीआवाज फाऊंडेशन गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण रोखणार

BMC शिवाजी पार्कचे भाडे वाढणार?

दादरमधील शिवाजी पार्क मैदान राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांसाठी विशेषकरून ओळखले जाते. या मैदानासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, अन्य सभा यांसाठी दिवसाला 250 रुपये एवढे नाममात्र शुल्क मुंबई महापालिकेकडून आकारले जाते. या शुल्कात वाढ करण्यासाठी मुंबई महापालिकेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाने महापालिकेच्या मालमत्ता विभागाशी ऑगस्टमध्ये पत्रव्यवहार केला आहे. भाडेवाढीबाबत योग्य ते धोरणही निश्चित करण्यात यावे, असेही पत्रात नमूद केले आहे.शिवाजी पार्क मैदानात अनेक खेळपट्ट्या असून क्रिकेटचा सराव आणि सामने होतात. फेरफटका मारण्यासाठीही अनेक जण पार्कात येतात. हे मैदान नेहमीच राजकीय सभांचे साक्षीदार राहिले आहे. येथे सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. सभांसाठी भल्या मोठ्या आकाराचे स्टेज उभारण्यासाठी मैदान खणले जाते. झेंडे, मोठे स्क्रीन बसवण्यासाठी बांबू लावण्यात येतात. कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांचीही सोय केली जाते. सभा होताच स्टेजसह सर्व साहित्य आयोजकांकडून नेण्यात येते. मात्र अनेकदा अशा सभांमुळे मैदानाची अवस्था खराब होते. या मैदानावर राजकीय पक्ष किंवा आयोजकांकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. हीच स्थिती धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतरही दिसून येते.सध्या राजकीय सभा, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शिवाजी पार्क मैदानातील जागा देताना मुंबई महापालिका दिवसाला अवघे 250 रुपये शुल्क अधिक जीएसटी एवढी रक्कम आकारते आणि 20 हजार रुपये अनामत रक्कम घेते. अत्यल्प शुल्क आणि डिपॉझिट पाहता, ते वाढवण्याचा विचार केला जात आहे. प्रस्तावित भाडेवाढीबाबत योग्य ते धोरण निश्चित करावे, असेही जी विभागाने पत्रात नमूद केले आहे.याआधीही शिवाजी पार्क मैदानाचे शुल्क वाढवण्याबाबत विचार झाला होता. मात्र नंतर तो मागे पडला. जी उत्तर विभागाने महापालिका मालमत्ता विभागाला दिलेल्या पत्रात याचाही उल्लेख केला आहे.शिवाजी पार्क मैदानासाठी एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक अनामत रक्कम आकारण्यासंदर्भातही विचार आहे. सभा किंवा कार्यक्रमांनंतर मैदानाच्या होणाऱ्या दुरवस्थेची वसुली काहीवेळा आयोजकांकडून अनामत रकमेमधूनच केली जाते. मात्र ती अत्यल्पच असते. गेली अनेक वर्षे कमी असलेल्या शुल्कामुळे यामध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे.हेही वाचामुख्यमंत्री लाडकी बहिन योजना : नोंदणीची अंतिम मुदत वाढवली
आवाज फाऊंडेशन गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण रोखणार

Go to Source