बोगस धनादेश देणाऱ्याला सहा महिन्यांची साधी शिक्षा

प्रतिनिधी/ बेळगाव कंग्राळी बी. के. येथील ओमकार अर्बन को-ऑप. सोसायटीकडून कार घेण्यासाठी कर्ज घेतले होते. मात्र संबंधित कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही. तसेच त्याने दिलेला धनादेश वटला नाही. त्यामुळे सहावे जेएमएफसी न्यायालयाने त्याला सहा महिन्यांची साधी शिक्षा सुनावली आहे. महादेव परशराम बाळेपुंद्री (रा. मंगाईनगर, येळ्ळूर) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने कंग्राळी बुद्रुक येथील […]

बोगस धनादेश देणाऱ्याला सहा महिन्यांची साधी शिक्षा

प्रतिनिधी/ बेळगाव
कंग्राळी बी. के. येथील ओमकार अर्बन को-ऑप. सोसायटीकडून कार घेण्यासाठी कर्ज घेतले होते. मात्र संबंधित कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही. तसेच त्याने दिलेला धनादेश वटला नाही. त्यामुळे सहावे जेएमएफसी न्यायालयाने त्याला सहा महिन्यांची साधी शिक्षा सुनावली आहे.
महादेव परशराम बाळेपुंद्री (रा. मंगाईनगर, येळ्ळूर) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने कंग्राळी बुद्रुक येथील ओमकार अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीतून 7 लाख 24 हजार रुपयाचे कर्ज 19 फेब्रुवारी 2015 रोजी घेतले होते. मात्र त्या कर्जाची त्याने परतफेड केली नाही. त्यानंतर त्या कर्जाचे व्याज देखील अधिक झाले. सोसायटीने तगादा लावल्यानंतर 12 लाख 46 हजार रुपयाचा धनादेश दिला. मात्र तो धनादेशच वटला नाही. त्यामुळे न्यायालयाने संबंधित कर्जदाराला सदर शिक्षा ठोठावली आहे. सोसायटीच्यावतीने अॅड. सुभाष पट्टण यांनी काम पाहिले आहे.