पहिल्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टीची पडझड

जागतिक बाजारात मिळता-जुळता कल : विप्रो नुकसानीत वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील सोमवारी धुलिवंदन असल्याने शेअर बाजाराला सुट्टी होती. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी व बाजारातील पहिल्या सत्रात बाजार नुकसानीसोबत बंद झाला आहे. यामध्ये विदेशी फंड गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली आहे. तसेच जागतिक बाजारांमध्येही मिळता-जुळता कल राहिल्याने भारतीय बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक […]

पहिल्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टीची पडझड

जागतिक बाजारात मिळता-जुळता कल : विप्रो नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील सोमवारी धुलिवंदन असल्याने शेअर बाजाराला सुट्टी होती. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी व बाजारातील पहिल्या सत्रात बाजार नुकसानीसोबत बंद झाला आहे. यामध्ये विदेशी फंड गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली आहे. तसेच जागतिक बाजारांमध्येही मिळता-जुळता कल राहिल्याने भारतीय बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत.
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी प्रारंभीच्या दरम्यान घसरणीचा कल राहिला होता. मात्र काहीशी रिकव्हरी झाल्यानंतर शेअरबाजार अंतिम क्षणी घसरणीसह बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये पाहता रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
दिग्ग्ज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 361.64 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 72,470.30 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 92.05 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 22,004.70 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, भारती एअरटेल, विप्रो, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेन्ट्स, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत.
अन्य कंपन्यांचा विचार केल्यास, बजाज फायनान्स, एनटीपीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, अॅक्सिस बँक, टाटा मोर्ट्स, इंडसइंड बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.
जागतिक बाजाराची स्थिती?
आशियातील बाजारांमध्ये जपानचा टोकीओ हा खालच्या स्तरावर बंद झाला. तर सियोल, चीनचा शांघाय आणि हाँगकाँगचा शेअर बाजार वधारुन बंद झाला आहे. युरोपीयन बाजार जास्त करुन वधारले आहेत. तसेच वॉल स्ट्रीट हा सोमवारी प्रभावीत होत बंद झाला आहे.  सोमवारी होळी असल्याने सुट्टी होती तर शुक्रवारी गुडफ्रायडे असल्याने बाजाराला सुट्टी राहणार आहे.