भांडुप : श्वानाला इजा केल्याप्रकरणी शिक्षिकेची शेजाऱ्याविरुद्ध तक्रार
भांडुप (bhandup) पश्चिम येथील एका शाळेतील शिक्षिकेने (teacher) त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या भटक्या श्वानाला (stray dogs) इजा केल्याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या रहिवाशाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.रीटा व्हिक्टर मॉन्टेरो (वय 45) ठाण्यातील न्यू होरायझन शाळेत शिक्षिका आहेत. त्यांनी अभिलाषा शिंदे या महिलेची तक्रार (FIR) केली आहे. मॉन्टेरो यांच्या म्हणण्यानुसार अभिलाषा शिंदे या महिलेने श्वानाच्या डोळ्यात वारंवार हानिकारक रसायने (chemicals) टाकली आहेत, ज्यामुळे श्वानाने आपला उजवा डोळा कायमचा गमावला आहे. या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी शिंदे यांच्याविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.माँटेरो हे राणी नावाच्या श्वानाची काळजी घेत होेते. त्याबाबत त्यांना पालिकेकडून रितसर परवानगी असल्याचेही माँटेरो यांनी म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये राणीच्या उजव्या डोळ्यातून रक्तस्त्राव (bleeding) होत होता. त्यामुले माँटेरो यांनी राणीवर पशुवैद्यकीय उपचार केले. तेव्हा त्यांना असे समजून आले की, राणीच्या डोळ्यांना हानीकारक रसायनांमुळे इजा झाली आहे.12 ऑक्टोबर रोजी माँटेरो यांच्या मुलीने शिंदे यांना राणीच्या अंगावर आणि डोळ्यात लाल रसायन टाकताना पाहिले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्येही रसायन टाकणारी व्यक्ती शिंदेच असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब त्यांनी सोसायटीचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या निदर्शनास आणून दिली आणि शिंदे यांना ताकीद देण्याची विनंती केली.तरीही, शिंदे यांनी पुन्हा राणीसोबत असाच प्रकार केल्याने राणीच्या डोळ्यांना इजा झाल्याचा आरोप माँटेरो यांनी केला आहे.माँटेरो यांनी पोलिस स्थानकात रितसर तक्रार केली असून पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज सादर केले आहे. भांडुप पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाईसाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत.हेही वाचापश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 फेऱ्यांमध्ये वाढआता महापालिका निवडणुकांची चाहूल
Home महत्वाची बातमी भांडुप : श्वानाला इजा केल्याप्रकरणी शिक्षिकेची शेजाऱ्याविरुद्ध तक्रार
भांडुप : श्वानाला इजा केल्याप्रकरणी शिक्षिकेची शेजाऱ्याविरुद्ध तक्रार
भांडुप (bhandup) पश्चिम येथील एका शाळेतील शिक्षिकेने (teacher) त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या भटक्या श्वानाला (stray dogs) इजा केल्याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या रहिवाशाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
रीटा व्हिक्टर मॉन्टेरो (वय 45) ठाण्यातील न्यू होरायझन शाळेत शिक्षिका आहेत. त्यांनी अभिलाषा शिंदे या महिलेची तक्रार (FIR) केली आहे.
मॉन्टेरो यांच्या म्हणण्यानुसार अभिलाषा शिंदे या महिलेने श्वानाच्या डोळ्यात वारंवार हानिकारक रसायने (chemicals) टाकली आहेत, ज्यामुळे श्वानाने आपला उजवा डोळा कायमचा गमावला आहे. या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी शिंदे यांच्याविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
माँटेरो हे राणी नावाच्या श्वानाची काळजी घेत होेते. त्याबाबत त्यांना पालिकेकडून रितसर परवानगी असल्याचेही माँटेरो यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबरमध्ये राणीच्या उजव्या डोळ्यातून रक्तस्त्राव (bleeding) होत होता. त्यामुले माँटेरो यांनी राणीवर पशुवैद्यकीय उपचार केले. तेव्हा त्यांना असे समजून आले की, राणीच्या डोळ्यांना हानीकारक रसायनांमुळे इजा झाली आहे.
12 ऑक्टोबर रोजी माँटेरो यांच्या मुलीने शिंदे यांना राणीच्या अंगावर आणि डोळ्यात लाल रसायन टाकताना पाहिले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्येही रसायन टाकणारी व्यक्ती शिंदेच असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब त्यांनी सोसायटीचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या निदर्शनास आणून दिली आणि शिंदे यांना ताकीद देण्याची विनंती केली.
तरीही, शिंदे यांनी पुन्हा राणीसोबत असाच प्रकार केल्याने राणीच्या डोळ्यांना इजा झाल्याचा आरोप माँटेरो यांनी केला आहे.
माँटेरो यांनी पोलिस स्थानकात रितसर तक्रार केली असून पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज सादर केले आहे. भांडुप पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाईसाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत.हेही वाचा
पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 फेऱ्यांमध्ये वाढ
आता महापालिका निवडणुकांची चाहूल