जितेंद्र आव्हाडांचा ईव्हीएम मशीनची छेडछाड केल्याचा आरोप

विधानसभा निवडणुकीत (maharashtra vidhan sabha election 2024) सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांना (candidates) सर्वाधिक मते मिळाली होती. तसेच हा कल कायम राहण्याची अपेक्षा होती. मात्र, मतमोजणीत तसे झाले नसल्याचे सांगत राष्ट्रवादी (ncp) काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी ईव्हीएम (EVM) मशीनबाबत शंका व्यक्त केली आहे. मतदान झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 6 ते 11 या वेळेत अचानक मतदानाची टक्केवारी कशी वाढली आणि वाढलेले मतदान आले कुठून? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी कळव्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागाच्या (election commission) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 2014 पासून मी मतदान यंत्रांच्या धोक्याबद्दल बोलत आहे. आव्हाड पुढे म्हणाले की, आमच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मतदान यंत्र मानवनिर्मित असल्याने त्याच्याशी छेडछाड होऊ शकते. मतदान केल्यानंतर मतदान क्रमांक लगेचच ईव्हीएम मशीनवर उपलब्ध होतो. मात्र, मतदानाची आकडेवारी देण्यास विलंब का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मतदान संपल्यानंतरही म्हणजे संध्याकाळी 6 ते 11 या वेळेत राज्यात तब्बल 76 लाख मतांची वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला. सहा नंतर जास्तीत जास्त अर्धा ते दोन टक्के मतदान वाढू शकते. मात्र काही जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 10 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला जवळपास सारखीच मते मिळाली असून पॅटर्नशिवाय हे शक्य नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. “आम्ही नांदेडमध्ये लोकसभेची एक जागा जिंकली आणि विधानसभेच्या सहा जागा गमावल्या. असे वेगवेगळे निकाल एकाच जिल्ह्यात कसे लावता येतील, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली असून हा कल कायम राहण्याची अपेक्षा होती. मात्र मतमोजणीत तसे झाले नाही. सर्व मतदारसंघात निवडणुकांचे निकाल सारखेच द्यायचे असतील तर संविधान आणि लोकशाहीचा उपयोग काय? यामुळे लोकशाही संपेल आणि भारताचा रशिया होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. मातोश्रीवरही तीच रणनीती आखली जात असल्याचे ते म्हणाले.हेही वाचा अजित पवार दिल्ली निवडणुकीत उतरणार मुंबईतील 4 ठिकाणी बहुस्तरीय रोबोटिक पार्किंग टॉवर उभारण्यात येणार

जितेंद्र आव्हाडांचा ईव्हीएम मशीनची छेडछाड केल्याचा आरोप

विधानसभा निवडणुकीत (maharashtra vidhan sabha election 2024) सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांना (candidates) सर्वाधिक मते मिळाली होती. तसेच हा कल कायम राहण्याची अपेक्षा होती. मात्र, मतमोजणीत तसे झाले नसल्याचे सांगत राष्ट्रवादी (ncp) काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी ईव्हीएम (EVM) मशीनबाबत शंका व्यक्त केली आहे. मतदान झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 6 ते 11 या वेळेत अचानक मतदानाची टक्केवारी कशी वाढली आणि वाढलेले मतदान आले कुठून? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी कळव्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागाच्या (election commission) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 2014 पासून मी मतदान यंत्रांच्या धोक्याबद्दल बोलत आहे. आव्हाड पुढे म्हणाले की, आमच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मतदान यंत्र मानवनिर्मित असल्याने त्याच्याशी छेडछाड होऊ शकते. मतदान केल्यानंतर मतदान क्रमांक लगेचच ईव्हीएम मशीनवर उपलब्ध होतो. मात्र, मतदानाची आकडेवारी देण्यास विलंब का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.मतदान संपल्यानंतरही म्हणजे संध्याकाळी 6 ते 11 या वेळेत राज्यात तब्बल 76 लाख मतांची वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला. सहा नंतर जास्तीत जास्त अर्धा ते दोन टक्के मतदान वाढू शकते. मात्र काही जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 10 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला जवळपास सारखीच मते मिळाली असून पॅटर्नशिवाय हे शक्य नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.“आम्ही नांदेडमध्ये लोकसभेची एक जागा जिंकली आणि विधानसभेच्या सहा जागा गमावल्या. असे वेगवेगळे निकाल एकाच जिल्ह्यात कसे लावता येतील, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली असून हा कल कायम राहण्याची अपेक्षा होती. मात्र मतमोजणीत तसे झाले नाही.सर्व मतदारसंघात निवडणुकांचे निकाल सारखेच द्यायचे असतील तर संविधान आणि लोकशाहीचा उपयोग काय?यामुळे लोकशाही संपेल आणि भारताचा रशिया होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. मातोश्रीवरही तीच रणनीती आखली जात असल्याचे ते म्हणाले. हेही वाचाअजित पवार दिल्ली निवडणुकीत उतरणारमुंबईतील 4 ठिकाणी बहुस्तरीय रोबोटिक पार्किंग टॉवर उभारण्यात येणार

Go to Source