तीन बांगलादेशी नागरिकांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

दहशवादी (terrorist) संघटना अल-कायदाची आघाडीची संघटना असलेल्या अन्सारुल्ला बांगला टीमच्या (ABT) सदस्यांना मदत केल्याचा आरोप तीन बांगलादेशी नागरिकांवर करण्यात आला होता. त्या प्रकरणाबाबत आरोपींना विशेष न्यायालयाने (court) गुरुवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसैन खान आणि मोहम्मद अझरअली सुभानल्ला यांना भारतीय दंड संहिता आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, न्यायालयाने या प्रकरणात आणखी दोन आरोपींना दोषी ठरवले होते व त्यांनाही पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, अनेक बांगलादेशी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे (pune) पोलिसांनी मार्च 2018 मध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. पुण्यातील धोबीघाट, भैरोबा नाला येथून पोलिसांनी हबीबला अटक केली आणि त्यानंतर या प्रकरणात पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास मे 2018 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. तपासात अटक करण्यात आलेले बांगलादेशी (bangladesh) नागरिक भारतात वैध कागदपत्राशिवाय राहत असल्याचे आढळून आले होते. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर पॅन कार्ड, आधार ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका इत्यादी मिळवले होते. तसेच त्यांचा वापर भारतीय सिमकार्ड मिळविण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी तसेच नोकरी मिळविण्यासाठी केल्याचा आरोप एनआयएने ठेवला होता. याशिवाय, सर्व आरोपी एबीटीच्या सदस्यांच्या संपर्कात असून त्यांना आश्रय आणि निधी दिल्याचे पुढील तपासात उघड झाल्याचेही एनआयएचा आरोप होता.हेही वाचा मुंबईतील 4 ठिकाणी बहुस्तरीय रोबोटिक पार्किंग टॉवर उभारण्यात येणार अजित पवार दिल्ली निवडणुकीत उतरणार

तीन बांगलादेशी नागरिकांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

दहशवादी (terrorist) संघटना अल-कायदाची आघाडीची संघटना असलेल्या अन्सारुल्ला बांगला टीमच्या (ABT) सदस्यांना मदत केल्याचा आरोप तीन बांगलादेशी नागरिकांवर करण्यात आला होता. त्या प्रकरणाबाबत आरोपींना विशेष न्यायालयाने (court) गुरुवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.मोहम्मद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसैन खान आणि मोहम्मद अझरअली सुभानल्ला यांना भारतीय दंड संहिता आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, न्यायालयाने या प्रकरणात आणखी दोन आरोपींना दोषी ठरवले होते व त्यांनाही पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, अनेक बांगलादेशी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे (pune) पोलिसांनी मार्च 2018 मध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. पुण्यातील धोबीघाट, भैरोबा नाला येथून पोलिसांनी हबीबला अटक केली आणि त्यानंतर या प्रकरणात पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास मे 2018 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. तपासात अटक करण्यात आलेले बांगलादेशी (bangladesh) नागरिक भारतात वैध कागदपत्राशिवाय राहत असल्याचे आढळून आले होते. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर पॅन कार्ड, आधार ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका इत्यादी मिळवले होते. तसेच त्यांचा वापर भारतीय सिमकार्ड मिळविण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी तसेच नोकरी मिळविण्यासाठी केल्याचा आरोप एनआयएने ठेवला होता. याशिवाय, सर्व आरोपी एबीटीच्या सदस्यांच्या संपर्कात असून त्यांना आश्रय आणि निधी दिल्याचे पुढील तपासात उघड झाल्याचेही एनआयएचा आरोप होता.हेही वाचामुंबईतील 4 ठिकाणी बहुस्तरीय रोबोटिक पार्किंग टॉवर उभारण्यात येणारअजित पवार दिल्ली निवडणुकीत उतरणार

Go to Source