बिहारमध्ये शालेय विद्यार्थी झाले बेशुद्ध
देशात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. याच दरम्यान बिहारमधून एक घटना समोर अली आहे. शाळा बंद होण्यापूर्वीच शालेय विध्यार्थी बेशुद्ध झाले. बिहारमध्ये भीषण गर्मीमुळे सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था 8 जून पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहे. शाळा बंद करण्यापूर्वी बुधवारी 300 पेक्षा जास्त विद्यार्थी बेशुद्ध पडलेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेल्या आदेशानंतर बुधवारी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळाला. तसेच बिहारमध्ये भीषण गर्मी आणि उन्हाची झळ पसरली आहे. वेगवेगळ्या जिल्यांमध्ये बुधवारी कमीतकमी 300 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षक चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिकाम्या पोटी शाळेत आले आणि भीषण उष्णता यामुळे विद्यार्थ्यांना हिट स्ट्रोक आणि डिहाइड्रेशन चे शिकार व्हावे लागले. जमुई, लखीसराय, मुंगेर या जिल्ह्यांमध्ये सर्वात जात विद्यार्थी बेशुद्ध पडलेत.
Edited By- Dhanashri Naik