रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन 16 आणि 17 मे रोजी चीनला भेट देणार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारी चीन दौऱ्यावर आहेत. गाझा आणि युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष वर्षभरात दुसऱ्यांदा चीनला भेट देणार आहेत. पाचव्या कार्यकाळात पदार्पण केल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच विदेश दौरा असेल. …

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन 16 आणि 17 मे रोजी चीनला भेट देणार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारी चीन दौऱ्यावर आहेत. गाझा आणि युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष वर्षभरात दुसऱ्यांदा चीनला भेट देणार आहेत. पाचव्या कार्यकाळात पदार्पण केल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच विदेश दौरा असेल. यादरम्यान पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अनेक व्यापक मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा करतील.

वृत्तानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष 16 मे आणि 17 मे रोजी चीनला भेट देणार आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही वर्षभरापूर्वी मॉस्कोला भेट दिली होती

 

पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीत अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याच्या पर्यायांवर चर्चा होऊ शकते. युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले होते. दरम्यान, रशियालाही अनेक देशांचा पाठिंबा मिळाला. रशियाला चीन, इराण आणि उत्तर कोरियाकडून पाठिंबा मिळत आहे,’

 

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पुतीन गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. यात उभय नेते “द्विपक्षीय संबंधांच्या विविध क्षेत्रातील सहकार्य आणि समान चिंतेच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर” चर्चा करतील असे म्हटले आहे. रशियाने एका निवेदनात या भेटीची पुष्टी केली असून पुतीन शी यांच्या निमंत्रणावरून चीनला भेट देणार असल्याचे म्हटले आहे. 

 

Edited by – Priya Dixit   

 

 

 

Go to Source