कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना मिळणार नवीन नावे
ब्रिटिशकालीन नावांमध्ये होणार बदल : मासिक बैठकीत नावे देण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील अनेक रस्त्यांना अद्याप ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत. परंतु ही नावे बदलावीत, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डकडे केली जात होती. याची दखल घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डने ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे बदलून त्यांना हुतात्मा जवानांची नावे देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. लवकरच या रस्त्यांना नवीन नावे दिली जाणार आहेत. ब्रिटिश काळापासून कॅन्टोन्मेंटमध्ये अनेक रस्त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत. अनेक नावे आज वापरात नसली तरीही त्या रस्त्यांना जुन्या नावानेच ओळखले जाते. नेल्सन रोड, हायस्ट्रीट, कोंडप्पा स्ट्रीट, तेलगू कॉलनी, ओल्ड पोस्ट ऑफिस रोड अशा विविध रस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव आहे. ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीयांवर अन्याय केले, त्यांचीच नावे अद्यापपर्यंत अनेक रस्त्यांना देण्यात आलेली असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी रस्त्यांची नावे बदलण्यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बैठकीत चर्चा करण्यात आली होती. कॅम्प व किल्ला येथील 20 ते 21 रस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे रस्त्यांना नवीन नावे मिळणार आहेत. हुतात्मा जवान, तसेच देशाच्या इतिहासात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्यांची नावे रस्त्यांना दिली जाणार आहेत. एप्रिल महिन्यात होणाऱ्या कॅन्टोन्मेंटच्या मासिक बैठकीत रस्त्यांना नवीन नावे देण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
हुतात्मा जवानांच्या नावांचा प्रस्ताव…
देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या जवानांची नावे कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना दिली जाणार आहेत. यासाठी कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांनी नागरिकांकडून नावांची यादी मागविली होती. बेळगाव व परिसरातील हुतात्मा जवानांच्या नावांची यादी एकत्रित करण्यात आली असून लवकरच ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
Home महत्वाची बातमी कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना मिळणार नवीन नावे
कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना मिळणार नवीन नावे
ब्रिटिशकालीन नावांमध्ये होणार बदल : मासिक बैठकीत नावे देण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील अनेक रस्त्यांना अद्याप ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत. परंतु ही नावे बदलावीत, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डकडे केली जात होती. याची दखल घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डने ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे बदलून त्यांना हुतात्मा जवानांची नावे देण्याचा प्रस्ताव मांडला […]