कोकण पदवीधरसाठी रत्नागिरीत सरासरी 70 टक्के मतदान

रत्नागिरी प्रतिनिधी कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया जिह्यात शांततेत पार पडली. एकूण 13 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे. दुपारपर्यंत जिह्यात पदवीधर मतदारांनी उत्तम प्रतिसाद देत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक रिंगणातील प्रमुख दोन राजकीय पक्षांच्या उमेदवारांमधील विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात तर काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी रत्नागिरीत […]

कोकण पदवीधरसाठी रत्नागिरीत सरासरी 70 टक्के मतदान

रत्नागिरी प्रतिनिधी

कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया जिह्यात शांततेत पार पडली. एकूण 13 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे. दुपारपर्यंत जिह्यात पदवीधर मतदारांनी उत्तम प्रतिसाद देत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक रिंगणातील प्रमुख दोन राजकीय पक्षांच्या उमेदवारांमधील विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात तर काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी रत्नागिरीत सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदार संघात 59. 31 टक्के तर जिह्यात 63. 35 टक्के मतदान झाले आहे. 1 जुलै रोजी पनवेल येथे मतमोजणी होणार आहे.