तेंडोलीत गवारेड्यांनी केले भातशेतीला लक्ष

गवारेड्यांचा बंदोबस्त करा ; शेतकऱ्यांची मागणी  वार्ताहर/ कुडाळ आता भातलावणी हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी भातलावणी करण्यासाठी तरवा पेरला आहे. परंतु वन्यप्राणी मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवित आहेत. तेंडोली- भोमबागायत येथील परिसरात गवारेड्यानी अक्षरशः धुडगूस घातला आहे.गवारेड्याच्या कळपाने सध्या शेतकऱ्यांच्या भातशेतीला लक्ष केले आहे. तेथील शेतकरी राघोबा थोरबोले व शंकर थोरबोले यांनी लावणीसाठी पेरलेला चार- […]

तेंडोलीत गवारेड्यांनी केले भातशेतीला लक्ष

गवारेड्यांचा बंदोबस्त करा ; शेतकऱ्यांची मागणी 
वार्ताहर/ कुडाळ
आता भातलावणी हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी भातलावणी करण्यासाठी तरवा पेरला आहे. परंतु वन्यप्राणी मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवित आहेत. तेंडोली- भोमबागायत येथील परिसरात गवारेड्यानी अक्षरशः धुडगूस घातला आहे.गवारेड्याच्या कळपाने सध्या शेतकऱ्यांच्या भातशेतीला लक्ष केले आहे. तेथील शेतकरी राघोबा थोरबोले व शंकर थोरबोले यांनी लावणीसाठी पेरलेला चार- पाच किलोचा तरवा गवारेड्यांच्या कळपाने मंगळवारी रात्री फस्त केला. त्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहेत. वनविभागाने भात शेतीची पाहणी करून पंचनामे करून गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.