आर्जु कंपनी फसवणूकपकरणी आणखी एकाला अटक

रत्नागिरी प्रतिनिधी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील आर्जु कंपनीकडून करण्यात आलेल्या फसवणूक पकरणी पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केल़ी संजय विश्वनाथ सावंत (33, ऱा पुनस-सावंतवाडी, ता. लांजा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े संजय याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होत़ा सत्र न्यायालयाने संजय याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होत़ा. यापकरणी आतापर्यंत […]

आर्जु कंपनी फसवणूकपकरणी आणखी एकाला अटक

रत्नागिरी प्रतिनिधी

शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील आर्जु कंपनीकडून करण्यात आलेल्या फसवणूक पकरणी पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केल़ी संजय विश्वनाथ सावंत (33, ऱा पुनस-सावंतवाडी, ता. लांजा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े संजय याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होत़ा सत्र न्यायालयाने संजय याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होत़ा.
यापकरणी आतापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आह़े याआधी पोलिसांनी प्रसाद शशिकांत फडके (34, ब्राह्मणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी, ता. जि. रत्नागिरी) व संजय गोविंद्र केळकर (49 ऱा तारवेवाडी-हातखंबा ता. जि. रत्नागिरी) यांना अटक केली होत़ी. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत़. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आर्थिक गुन्हे शाखेमार्पत आतापर्यंत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, औरंगाबाद व सातारा जिह्यातील बळी पडलेल्या एकूण 525 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत तसेच फसवणूक झालेली रक्कम 5 कोटी 92 लाख 69 हजार 866 रुपये आहे.