मिऱ्या- नागपूर महामार्ग मार्च 2025 ला होणार पूर्ण
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी मिऱ्या ते नागपूर या महामार्गाचे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चौपदरीकरण कामाने कमालीची गती घेतलेली आहे. रत्नागिरी ते दख्खन या टप्प्प्यातील हे चौपदरीकरण काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. त्यादृष्टीने सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यातील संकटावर मात करत या कालावधीतही या महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सुमारे येथील 54 टक्के चौपदरीकरण काम पूर्णत्वास गेले असल्याची माहिती मिऱया-नागपूर महामार्ग पकल्प अधिकारी वसंत पंदेरकर यांनी दिली.