राजनाथ सिंह यांच्याकडे जाहीरनामा समितीची धुरा
निर्मला सीतारामन निमंत्रक : पियुष गोयल सहनिमंत्रक : समितीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह 27 जणांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी जाहीरनामा समिती जाहीर केली. समितीमध्ये एकूण 27 सदस्य आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या निमंत्रक आणि पियुष गोयल यांना सहनिमंत्रक बनवण्यात आले आहे. याशिवाय चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही या समितीत समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि छत्तीसगडचे विष्णुदेव साय या समितीत आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर केली. या समितीत अर्जुन मुंडा, किरेन रिजिजू, अश्विनी वैष्णव, शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, अर्जुनराम मेघवाल, वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही या समितीत समावेश आहे. एकंदर 27 जणांच्या या समितीमध्ये विविध राज्यांमधील नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून पियूष गोयल आणि विनोद तावडे या दोघांना समाविष्ट करण्यात आले असून कर्नाटकातून राजीव चंद्रशेखर यांना सदस्य बनवण्यात आले आहे.
भाजपने जारी केलेल्या निवडणूक जाहीरनामा समितीमध्ये रविशंकर प्रसाद आणि सुशील मोदी या बिहारमधील दोघांचा समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही समितीत स्थान मिळाले आहे. तारिक मन्सूर, ओ. पी. धनखड यांच्या नावाचाही समिती सदस्यांमध्ये समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी प्रभारी, सहप्रभारींची घोषणा
भारतीय जनता पक्षाने दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यांच्या निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली होती. या यादीत 10 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांची नावे समाविष्ट आहेत. एकूण 18 नावे आहेत. ज्यामध्ये 10 प्रभारी आणि 8 सहप्रभारींच्या नावांचा समावेश आहे. ओs. पी. धनखड यांना दिल्लीचे प्रभारी आणि डॉ. अलका गुर्जर यांना दिल्लीचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे. महाराष्ट्राचा पदभार खासदार डॉ. दिनेश शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तसेच, येथे दोन सहप्रभारी बनवण्यात आले असून त्यात निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंग पवैया यांच्या नावांचा समावेश आहे.
Home महत्वाची बातमी राजनाथ सिंह यांच्याकडे जाहीरनामा समितीची धुरा
राजनाथ सिंह यांच्याकडे जाहीरनामा समितीची धुरा
निर्मला सीतारामन निमंत्रक : पियुष गोयल सहनिमंत्रक : समितीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह 27 जणांचा समावेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी जाहीरनामा समिती जाहीर केली. समितीमध्ये एकूण 27 सदस्य आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या निमंत्रक आणि पियुष गोयल यांना सहनिमंत्रक बनवण्यात आले […]