गुजरातसमोर आज हैदराबादचे कडवे आव्हान

वृत्तसंस्था/ अहमदाबाद गुजरात टायटन्सचा मुकाबला आज रविवारी सनरायझर्स हैदराबादशी होणार असून हैदराबादला रोखायचे असेल, तर, गुजरातच्या गोलंदाजीतील आक्रमणाला काही अंश आपली कामगिरी सुधारावी लागेल. सनरायझर्सने मागील सामन्यात आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या नोंदविताना मुंबई इंडियन्सविऊद्ध 277 धावा काढून मोसमातील त्यांचा पहिला विजय मिळवलेला आहे. तर मुंबई इंडियन्सविऊद्ध घरच्या मैदानावर विजयाने सुऊवात केलेल्या कर्णधार शुभमन गिलच्या टायटन्स संघाच्या […]

गुजरातसमोर आज हैदराबादचे कडवे आव्हान

वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात टायटन्सचा मुकाबला आज रविवारी सनरायझर्स हैदराबादशी होणार असून हैदराबादला रोखायचे असेल, तर, गुजरातच्या गोलंदाजीतील आक्रमणाला काही अंश आपली कामगिरी सुधारावी लागेल. सनरायझर्सने मागील सामन्यात आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या नोंदविताना मुंबई इंडियन्सविऊद्ध 277 धावा काढून मोसमातील त्यांचा पहिला विजय मिळवलेला आहे. तर मुंबई इंडियन्सविऊद्ध घरच्या मैदानावर विजयाने सुऊवात केलेल्या कर्णधार शुभमन गिलच्या टायटन्स संघाच्या वाट्याला चेन्नईमध्ये घसरण आली.
उमेश यादव हा दुखापतग्रस्त मोहम्मद शमीची उणीव भरून काढू शकत नसून टायटन्ससाठी ही सर्वांत मोठी परिणामकारक बाब ठरत आहे. मागील पराभवामुळे त्यांच्या निव्वळ धावसरासरीवर परिणाम होऊन ती उणे 1.425 पर्यंत घसरली आहे. लीगच्या 10 संघांमधील ही सर्वांत खराब सरासरी आहे. आपल्या अष्टपैलू कौशल्यासह संघात आवश्यक संतुलन राखणाऱ्या हार्दिक पंड्याला गमावणे ही त्यांच्यासाठी मोठी मारक बाब ठरली आहे हे नाकारता येणार नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीत त्यांचे फलंदाजीतील प्रदर्शन निकृष्ट राहिलेले आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या 207 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या फलंदाजांचा दृष्टिकोन हा एकदिवसीय सामन्यांसारखा राहिला आणि साई सुदर्शन वगळता कोणीही 30 धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. सुदर्शन, विजय शंकर यांची फलंदाजी एकसुरी दिसत आहे, तर गिलची टी-20 मधली फलंदाजी त्याच्या 31 आणि 8 धावांच्या खेळीनंतर पुन्हा छाननीचा विषय बनेल. त्यांचा फिनिशर मिलर (12 आणि 21) हा देखील संघर्ष करत आहे.
दुसरीकडे, डार्क हॉर्स सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या मागील सामन्यात घरच्या मैदानावर विक्रमी कामगिरी करून दाखविलेली आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचललेल्या ट्रॅव्हिस हेडने (24 चेंडूंत 62 धावा) सनरायझर्सतर्फे धूमधडाक्यात पदार्पण करताना 18 चेंडूंत पन्नाशी पार करून संघाचे लीगमधील सर्वांत वेगवान अर्धशतक नोंदविले. त्यानंतर हा पराक्रम मागे टाकताना अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेची एडन मार्करम आणि हेन्रिक क्लासेन ही जोडीही दमदार फॉर्ममध्ये असल्याने उमेश यादव आणि रशिद खान या खेळाडूंची कसोटी लागणार आहे. दुपारचा सामना असल्याने येथील कोरडी खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यादृष्टीने फायदा उठविण्यासाठी रशिद आणि साई किशोर असे फिरकीपटू दोन्ही संघांकडे आहेत. सनरायझर्सची केवळ फलंदाजीच नाही, तर गोलंदाजी देखील संतुलित दिसली आहे.
संघ-गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, रॉबिन मिन्झ, केन विल्यमसन, अभिनव मंधार, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहऊख खान, जयंत यादव, राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी, शशांत मिश्रा, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, साई किशोर, उमेश यादव, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा व मानव सुतार.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेन्रिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंह यादव, उमरान मलिक, नितीशकुमार रे•ाr, फजलहक फाऊकी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, आकाश सिंग आणि जे. सुब्रमण्यन.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.