राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत बेळगावमध्ये आंदोलन

बेळगाव : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत हिंदू संबंधीचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी बेळगाव भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी उद्यान ते बँक ऑफ इंडिया कॉर्नरपर्यंत मोर्चा काढून त्यानंतर साखळी उपोषण करण्यात आले. राहुल गांधी यांनी केलेल्या ‘हिंदू’ विधानावरून गदारोळ माजला. याचे पडसाद बेळगावमध्येही उमटल्याचे दिसून आले. स्थानिक […]

राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत बेळगावमध्ये आंदोलन

बेळगाव : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत हिंदू संबंधीचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी बेळगाव भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी उद्यान ते बँक ऑफ इंडिया कॉर्नरपर्यंत मोर्चा काढून त्यानंतर साखळी उपोषण करण्यात आले. राहुल गांधी यांनी केलेल्या ‘हिंदू’ विधानावरून गदारोळ माजला. याचे पडसाद बेळगावमध्येही उमटल्याचे दिसून आले. स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या वक्तव्याचा निषेध केला. तसेच राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यापूर्वीच पुतळा आंदोलकांकडून काढून घेतला. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता.