चलवादी समाजासाठी दोन एकर जमीन द्या
चलवादी महासभेचे मंत्री महादेवप्पा यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये दलितांमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक चलवादी समाजातील आहेत. या समाजातील नागरिक आर्थिकदृष्ट्या मागास असून वेगवेगळी कामे करून उपजिविका चालवत आहेत. या समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन चलवादी समाज महासभेतर्फे समाज कल्याणमंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांना देण्यात आले.
चलवादी समाजातील बहुतांश नागरिक कुली कामगार आहेत. स्वच्छतेचे काम करतात. या समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अथवा इतर कार्यक्रमांसाठी आर्थिक मदत मिळविणे आवश्यक आहे. यासाठी चलवादी महासभेकडून अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच उत्तर कर्नाटकातील चलवादी सांस्कृतिक भवन उभारण्यासाठीही मागणी करण्यात आली होती. मात्र, याकडेही दुर्लक्ष झाले आहे.
बेंगळूर येथे चलवादी भवन उभारण्यात आले आहे. बेळगावमध्येही त्याप्रमाणे भवन उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. समाजाच्या सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांसाठी भवन तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी दोन एकर जमीन, याबरोबरच 5 कोटी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी कुडचीचे आमदार महादेव तम्मन्नावर, चलवादी महासभा जिल्हाध्यक्ष दुर्गेश मेत्री, राष्ट्रीय दलित नेते मल्लेश चौगुले, जिल्हा कार्याध्यक्ष हणमंत मधाळे, उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, बसवराज कोलकार आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी चलवादी समाजासाठी दोन एकर जमीन द्या
चलवादी समाजासाठी दोन एकर जमीन द्या
चलवादी महासभेचे मंत्री महादेवप्पा यांना निवेदन बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये दलितांमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक चलवादी समाजातील आहेत. या समाजातील नागरिक आर्थिकदृष्ट्या मागास असून वेगवेगळी कामे करून उपजिविका चालवत आहेत. या समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन चलवादी समाज महासभेतर्फे समाज कल्याणमंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांना देण्यात आले. चलवादी समाजातील बहुतांश नागरिक कुली कामगार […]