तालुक्यात मटका, जुगारावर पोलिसांनी कारवाई करावी

राजकीय नेत्यांचे हस्तकच गुंतले मटका अन् जुगारात : अनेकजण कॅसिनोच्याही आहारी गेल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ खानापूर : तालुक्यात मटका, जुगार, सट्टाबाजार आणि कॅसिनोसारख्या जुगारात तालुक्यातील अनेक युवक गोवले आहेत. अनेकांना या नादापाई भिकेकंगाल व्हावे लागले आहे. तर अनेकांनी आपले जीवनही संपविले आहे. काहीजण देशोधडीला लागलेले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकाराकडे खानापूर पोलीस कानाडोळा करत असून […]

तालुक्यात मटका, जुगारावर पोलिसांनी कारवाई करावी

राजकीय नेत्यांचे हस्तकच गुंतले मटका अन् जुगारात : अनेकजण कॅसिनोच्याही आहारी गेल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ
खानापूर : तालुक्यात मटका, जुगार, सट्टाबाजार आणि कॅसिनोसारख्या जुगारात तालुक्यातील अनेक युवक गोवले आहेत. अनेकांना या नादापाई भिकेकंगाल व्हावे लागले आहे. तर अनेकांनी आपले जीवनही संपविले आहे. काहीजण देशोधडीला लागलेले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकाराकडे खानापूर पोलीस कानाडोळा करत असून तालुक्यात अशा प्रकारच्या जुगाराना ऊत आला असून, यावर पोलिसानी कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तालुक्यात मटका, जुगार आणि सट्टा बाजारही मोठ्या प्रमाणात सुरू असून, यात राजकीय नेत्यांचे हस्तकच मटका आणि जुगारात गुंतलेले आहेत. त्यांच्या माध्यमातूनच खानापूर तालुक्यात मटका राजरोसपणे सुरू आहे. मटका मोबाईलवरून घेण्यात येतो आणि काही वेळेला ते वर पाठवले जातात. बऱ्याचवेळा हेच लोक मटक्याचे पैसे आपल्याकडेच ठेवून गब्बर झाले आहेत. तसेच सट्टेबाजारातही अनेक तरुण गुंतले आहेत. काही दिवसापूर्वी गोव्यातील एका घरात सट्टेबाजार घेताना खानापुरातील काही तरुणाना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून मोठी रक्कमही जप्त करण्यात आली होती. या तरुणाना काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभल्याची चर्चा खानापुरात सुरू होती.
अनेकजण कॅसिनोच्या आहारी
तालुक्यात गोवा जवळ असल्याने अनेकजण कॅसिनोच्याही आहारी गेल्याने अनेकाना कर्जबाजारी व्हावे लागले आहे. तर काहीजण याच भिकेकंगाल अवस्थेत जगत आहेत. तर काही तरुण कर्जबाजारी झाल्याने अनेकजण गाव सोडून जावू लागले आहे. तर काही जणानी जीवनाचा शेवटही केला आहे. तसेच तालुक्यात मटकाही राजरोसपणे सुरू असून मटका मोठ्या प्रमाणात खेळला जातो. यात मोबाईलवरुन आकडे घेण्यात येतात. यात अनेक कुटुंबे आणि मटका खेळून कर्जबाजारी होऊन उदध्वस्त झालेले आहेत. मात्र मटका घेऊन डब मारणारे गब्बर झालेले आहेत. अशी चर्चा शहरासह तालुक्यात होत आहे.  तालुक्यात अनेक ठिकाणी जुगारी अ•sही चालवले जात असल्याचीही चर्चा आहे. या मटका, जुगार आणि सट्टेबाजारात कोण आहे. हे सर्व पोलीस खात्याला माहिती असूनही त्यांनी याबाबत कारवाई करण्यास कानाडोळा करत आहेत. कॅसिनोच्या आहारी जावून अनेकजण देशोधडीला लागलेले असताना तालुक्यातील अनेकजण गोवा येथे कॅसिनो खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण जात असल्याचे चित्र आहे. खानापूर परिसरात टॅक्सी व्यवसायाला चांगले दिवस आलेले आहेत. या सर्व प्रकारामुळे तरुण चंगळ वादाकडे ओढला गेला असून त्यांना पैशाची चट लागल्याने अनेक ठिकाणी चोऱ्या तसेच इतर प्रकारही उघडकीस आले आहेत. सट्टेबाजार, जुगारी अ•ाचालक, मटका घेणारे हे लोक पोलिसांच्या जवळचे असल्याचे चित्र खानापुरात दिसून येत आहे. तसेच या लोकांच्या वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमातही पोलिसांची स्थिती चर्चेचा विषय बनली आहे.