देशात उष्‍माघाताने ४३ जणांचा मृत्‍यू

देशात उष्‍माघाताने ४३ जणांचा मृत्‍यू

Bharat Live News Media ऑनलाईन : देशात वाढती उष्‍णता आणि उष्‍णतेच्या लाटेमुळे अनेक राज्‍यांमध्ये लोकांचे मृत्‍यू झाले आहेत. आतापर्यंत देशात भीषण उष्‍णतेमुळे तब्‍बल ४३ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. बिहारमध्ये २० लोकांनी उष्‍णतेमुळे आपले प्राण गमावले आहेत. तसेच ओडिशामध्ये १० लोकांचा उष्‍णतेमुळे मृत्‍यू झाला आहे.
बिहारच्या अनेक भागात (गुरूवार) उष्‍णतेचा पारा ४४ डिग्री सेल्‍सियसच्या वर पोहोचला. राज्‍यातील २० लोकांचा यामुळे मृत्‍यू झाला. औरंगाबादच्या आरोग्‍य विभागाच्या मते, उष्णतेच्या लाटेमुळे 12 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. या शिवाय झारखंडच्या पलामू जिल्‍ह्यात गेल्‍या २४ तासात ५ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. तसेच ओडिशामध्येही अनेक लोक प्राणाला मुकले आहेत.
कोणत्या राज्यात उष्णतेमुळे किती मृत्यू?

बिहार, झारखंड, ओडिशासह पूर्ण उत्‍तर भारतात भीषण उष्‍णतेची लाट आहे. बिहारच्या अनेक भागात तापमान ४४ डिग्री सेल्‍सिअसच्या पुढे गेले आहे. पलामू जिल्‍ह्यात गुरूवारी तापमान ४७.४ डिग्री सेल्‍सिअस इतके नोंदवले गेले आहे. गेल्‍या तीन दिवसांपासून पलामूचे तापमान ४७ डिग्री इतके नोंदवले गेले आहे. गुरूवारी ओडिशाच्या रूरकेला मध्ये उष्‍णतेमुळे १० लोकांचा मृत्‍यू झाला.
हेही वाचा : 

Donald Trump: पॉर्न स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी

Sassoon hospital : डॉ. तावरेला सुरुवातीपासूनच आर्थिक लाभाचा ‘संसर्ग’

पंतप्रधान मोदींची दुसऱ्या दिवशही विवेकानंद शिलेवर ध्यानधारणा; पहा व्हिडीओ

Go to Source