अतिथी शिक्षक रुजू करून घेण्याचे आदेश

खानापूर तालुक्यात अद्याप 165 शिक्षकांची कमतरता : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळानिहाय आदेश जारी  खानापूर : खानापूर तालुक्यात प्राथमिक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून गेल्या चार वर्षापासून अतिथी शिक्षकांवरच शाळांचे भविष्य अवलंबून आहे. यावर्षी तालुक्यात 394 शिक्षकांची गरज आहे. इतक्या शिक्षकांची गरज असताना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात 229 अतिथी शिक्षकांना रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या यादीत 229 शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळानिहाय […]

अतिथी शिक्षक रुजू करून घेण्याचे आदेश

खानापूर तालुक्यात अद्याप 165 शिक्षकांची कमतरता : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळानिहाय आदेश जारी 
खानापूर : खानापूर तालुक्यात प्राथमिक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून गेल्या चार वर्षापासून अतिथी शिक्षकांवरच शाळांचे भविष्य अवलंबून आहे. यावर्षी तालुक्यात 394 शिक्षकांची गरज आहे. इतक्या शिक्षकांची गरज असताना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात 229 अतिथी शिक्षकांना रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या यादीत 229 शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळानिहाय आदेश जारी केला असून शाळा सुधारणा कमिटीने शासनाच्या नियमावलीप्रमाणे शिक्षकांना ऊजू करून घ्यायचे आहे. खानापूर तालुक्यात प्राथमिक शाळेत शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. गेल्या चार वर्षापासून अतिथी शिक्षकांवरच शाळा सुरू आहेत. तालुक्यात 394 अतिथी शिक्षकांची मागणी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र शिक्षण खात्याकडून खानापूर तालुक्याच्या पहिल्या टप्प्यात 229 अतिथी शिक्षकांची नेमणूक करून घेण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली असल्याने खानापूर तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळानिहाय 231 अतिथी शिक्षकांना घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मराठी शिक्षकांची मोठी कमतरता
यात कन्नड 111, मराठी 108, उर्दू 4 आणि इंग्रजी 6 असे शिक्षक घेण्यात येणार आहेत. मात्र अद्याप 165 शिक्षकांची कमतरता असल्याने यात मराठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शाळेत शिक्षकांची कमतरता भासणार आहे. यासाठी उर्वरित 165 शिक्षकांची नेमणूक लवकरात लवकर करण्यात यावी. तरच प्राथमिक शाळेतील शिक्षण योग्यप्रकारे होणार आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. सध्या बदली शिक्षकांवरच शाळांचे भवितव्य अवलंबून असल्याने एका शिक्षकावर दोन दोन शाळेचा भार असल्याने शिक्षकांनाही फार मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी आमदार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उर्वरित 165 अतिथी शिक्षक नेमणूक करून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.