पद्म पुरस्कारांच्या वितरणात आता पारदर्शकता

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन : पात्र लोकांना मिळतोय पुरस्कार वृत्तसंस्था/ गुवाहाटी पद्म पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत आता पारदर्शकता आली आहे. पद्म पुरस्कार आता पात्र लोकांना मिळू लागला आहे. एकेकाळी पद्म पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत इव्हेंट मॅनेजमेंट आणि वरदहस्त सामील असायचा. परंतु आता या वाईट प्रथा दूर झाल्याचे उद्गार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काढले आहेत. पद्म पुरस्कारांसाठी […]

पद्म पुरस्कारांच्या वितरणात आता पारदर्शकता

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन : पात्र लोकांना मिळतोय पुरस्कार
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
पद्म पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत आता पारदर्शकता आली आहे. पद्म पुरस्कार आता पात्र लोकांना मिळू लागला आहे. एकेकाळी पद्म पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत इव्हेंट मॅनेजमेंट आणि वरदहस्त सामील असायचा. परंतु आता या वाईट प्रथा दूर झाल्याचे उद्गार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काढले आहेत. पद्म पुरस्कारांसाठी आता पारदर्शक प्रक्रिया अवलंबिण्यात येत असल्याने मागील काही वर्षांमध्ये समाजासाठी योगदान दिलेल्या परंतु चर्चेत न राहिलेल्या व्यक्तींचा गौरव होत आहे.
वरदहस्त, मैत्री किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमुळे मिळालेला पुरस्कार हा प्रत्यक्षात गौरव नसतो, कारण याची कुठलीच विश्वासार्हता राहत नसल्याचे धनखड यांनी म्हटले आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते आसामच्या नागरी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. समाजाच्या वैविध्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 22 व्यक्तींना अत्यंत पारदर्शक पद्धतीने राज्याचा नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘आसाम वैभव’ राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांना प्रदान करण्यात आला. तर ‘आसाम सौरभ’ पुरस्काराने चार जणांना सन्मानित करण्यात आले. तर आसाम गौरव पुरस्कारने 17 जणांना गौरविण्यात आले.
देश आता विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. लवकरच भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणार आहे. आमच्या 5 हजार वर्षे जुन्या संस्कृतीने आम्हाला जगाला मार्ग दाखवून देणे शिकविले आहे. पूर्वी जे लोक भारताला सल्ला देत होते, तेच आता भारताकडून सल्ला मागू लागले आहेत असे उद्गार उपराष्ट्रपतींनी काढले आहेत.