महिंद्रा अॅण्ड महिंद्राची तिमाहीत मोठी कमाई

कंपनीच्या महसूलात 15 टक्क्यांची वाढ नवी दिल्ली : बुधवारी चारचाकी वाहन क्षेत्रातील कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या ऑटो क्षेत्रातील कंपनीची कामगिरी तिमाहीत चमकदार झालेली असून महसुलात 15 टक्क्यांची वाढ नेंदवली असून टेक महिंद्राने नफ्यात घसरण नोंदवली असल्याचे समजते. या निकालात कंपनीने सांगितले की, ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत करानंतरचा […]

महिंद्रा अॅण्ड महिंद्राची तिमाहीत मोठी कमाई

कंपनीच्या महसूलात 15 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली :
बुधवारी चारचाकी वाहन क्षेत्रातील कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या ऑटो क्षेत्रातील कंपनीची कामगिरी तिमाहीत चमकदार झालेली असून महसुलात 15 टक्क्यांची वाढ नेंदवली असून टेक महिंद्राने नफ्यात घसरण नोंदवली असल्याचे समजते.
या निकालात कंपनीने सांगितले की, ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत करानंतरचा नफा 34 टक्क्यांनी वाढून 2658 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या महसुलातही 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कंपनीच्या नफ्यात वाढ होण्याचे कारण मजबूत कार विक्री हे आहे. त्यातही कंपनीच्या एसयुव्ही गटातील कार्सना ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा करपश्चात नफा 1,984 कोटी रुपये होता.करानंतरचा नफा वगळता, कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की डिसेंबर तिमाहीत महसूल 30,621 कोटी रुपयांच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढून 35,299 कोटी रुपये झाला आहे. सहकारी कंपनी टेक महिंद्राने डिसेंबरच्या तिमाहीत नफ्यात काहीशी घसरण नोंदवली आहे. टेक महिंद्रा आव्हानात्मक परिस्थितीत उत्तमपणे काम करत आहे. याचदरम्यान शेअरबाजारात कंपनीचा समभाग बुधवारी 1646 रुपयांवर व्यवहार करत होता.
काय म्हणाले सीईओ
महिंद्रा आणि महिंद्राचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक अनिश शाह म्हणाले की, कंपनीच्या विविध व्यवसायांनी उत्तम कामगिरी केली असून त्यातही ऑटो क्षेत्रातील कंपनीची कामगिरी सर्वात उठून दिसणारी ठरली आहे. बाजारात वाहन विक्रीत कंपनीने दुप्पट वाढीव नफा मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसेच बाजारात वाटाही वाढवण्यात यश मिळवले आहे. टेक महिंद्राला मात्र बाजारातील स्पर्धात्मक परिस्थितीशी सामना करावा लागतो आहे. म्हणून तिमाहीत कामगिरी म्हणावी तशी दिसलेली नाही.