कनिष्ठ एअर रायफल मिश्र नेमबाजीत भारताला सुवर्ण, रौप्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनमधील ग्रेनाडा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत 10 मी. एअर रायफल ज्युनियर मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण व रौप्यपदक पटकावले.
इशा अनिल टाकसाळे व उमामहेश मद्दिनेनी यांनी अंतिम लढतीत आपल्याच देशाच्या अन्वी राठोड व अभिनव शॉ यांचा 16-8 असा पराभव करीत सुवर्ण मिळविले. अन्वी व अभिनव यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताची एकूण पदकसंख्या आता 7 झाली असून त्यात 3 सुवर्णपदकांचा समावेश आहे. अन्वी व अभिनव यांनी पात्रता फेरीत 629.0 गुण घेतले तर इशा व उमामहेश यांनी 627.4 गुण घेत त्यांच्यापेक्षा मागे राहिले होते.
इशा व उमामहेश यांनी अनुक्रमे महिला व पुरुष वैयक्तिक गटातही सुवर्णपदके मिळविली आहेत. त्याआधी दृष्टी सांगवान व पारस खोला यांना एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविता आली नाही. 560 गुणांसह त्यांनी पात्रता फेरीत सहावे स्थान मिळविले. या प्रकारात जॉर्जियाच्या नेमबाजांनी सुवर्ण व रौप्य मिळविले. 34 सदस्यीय भारतीय पथक सहभागी झाले असून त्यात फक्त ज्युनियर व सिनियर 10 मी. एअर गन स्पर्धकांचा समावेश आहे.
Home महत्वाची बातमी कनिष्ठ एअर रायफल मिश्र नेमबाजीत भारताला सुवर्ण, रौप्य
कनिष्ठ एअर रायफल मिश्र नेमबाजीत भारताला सुवर्ण, रौप्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली स्पेनमधील ग्रेनाडा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत 10 मी. एअर रायफल ज्युनियर मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. इशा अनिल टाकसाळे व उमामहेश मद्दिनेनी यांनी अंतिम लढतीत आपल्याच देशाच्या अन्वी राठोड व अभिनव शॉ यांचा 16-8 असा पराभव करीत सुवर्ण मिळविले. अन्वी व अभिनव यांना रौप्यपदकावर समाधान मानावे […]