आता या मंदिरात प्रसाद घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे, तेव्हाच मिळणार लाडूचा प्रसाद

तिरुमला तिरुपती देवस्थान मध्ये बोर्ड ने तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद स्वरुपात मिळणाऱ्या लाडूंना घेण्यासाठी नवीन नियम लागू केला आहे. बोर्डचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी वेंकैया चौधरी यांनी सांगितले की, भक्तांजवळ देवाच्या दर्शनासाठी तिकीट …

आता या मंदिरात प्रसाद घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे, तेव्हाच मिळणार लाडूचा प्रसाद

तिरुमला तिरुपती देवस्थान मध्ये बोर्ड ने तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद स्वरुपात मिळणाऱ्या लाडूंना घेण्यासाठी नवीन नियम लागू केला आहे.

 

बोर्डचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी वेंकैया चौधरी यांनी सांगितले की, भक्तांजवळ देवाच्या दर्शनासाठी तिकीट राहणार नाही. त्यांच्यासाठी आधार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. अश्यावेळेस भक्तांना जर प्रसाद घ्यायचा असेल तर त्यांना आधारकार्ड दाखवावे लागेल. टिकट घेऊन दर्शन करण्याऱ्या भक्तांना आधारकार्ड दाखवण्याची आवश्यकता नाही. 

 

सांगितले जाते आहे की, प्रसादाच्या लाडूची अति मागणी पाहून  काही दलाल प्रसादाला मोठ्या किंमतीत विकत होते. यामुळे अनेक भक्तांची फसवणूक होत होती. याला थांबवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. 

 

तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी वेंकैया चौधरी यांनी माहिती दिली की, लाडू कॉम्प्लेक्समध्ये स्पेशल काउंटर बनवण्यात आले आहे, जिथे भक्त काउंटर नंबर 48 आणि 62 वर लाडू प्राप्त करतील. तसेच त्यांनी सांगितले की, दर्शनासाठी टोकन किंवा टिकट असणारे भक्त पाहिल्याप्रमाणे एक मोफत लाडू मिळाल्यानंतर देखील, अजून लाडू विकत घेऊ शकतात. याशिवाय, ज्या भकतांजवळ दर्शन तिकीट आणि टोकन नाही, त्यांनी लाडूचा प्रसाद घेण्यासाठी आधारकार्ड दाखवणे आवश्यक राहील. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source