अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत अज्ञाताचा शिरकाव, पोलिसांनी घेतले ताब्यात

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली जोरात आहेत. राष्ट्राध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार – डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस हे रॅलीमध्ये सतत एकमेकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी शुक्रवारी …

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत अज्ञाताचा शिरकाव, पोलिसांनी घेतले ताब्यात

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली जोरात आहेत. राष्ट्राध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार – डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस हे रॅलीमध्ये सतत एकमेकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी शुक्रवारी पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेतली, जिथे एका व्यक्तीने शिरकाव केल्याने ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यव्स्थावर प्रश्न उद्भवत आहे. 

गेल्या महिन्यात पेनसिल्व्हेनियामध्ये एका रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर शूटरने हल्ला केला होता. या हल्ल्यात गोळी त्याच्या कानाजवळून गेली आणि त्यात ते सुदैवाने बचावले. आता पुन्हा अज्ञाताने त्यांच्या रॅलीत शिरून प्रश्न उभे केले आहे. 

रॅली मध्ये ट्रम्प बोलताना एक अज्ञात व्यक्ती मीडिया परिसरात पोहोचला आणि मंचाच्या समोरच्या भागात चढू लागला. पोलिसांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवत त्याला ताब्यात घेतले आहे. 

मात्र, त्याला का अटक करण्यात आली आहे किंवा यापूर्वी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीशी त्याचा काही संबंध आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source