छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यामागची कारणे शोधण्यासाठी समिती

मालवणच्या (malvan) राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (chhatrapati shivaji maharaj statue) काही दिवसांपूर्वीच कोसळला होता. आता याप्रकरणी राज्य सरकारने समितीची स्थापना केली आहे. ही समिती महाराजांचा पुतळा पडल्याची कारणे शोधणार आहे.  पुतळा पडल्याची कारणे शोधून त्यासंदर्भात सविस्तर विश्लेषण करण्यात येणार. या समितीत अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी आणि नौदलाच्या अधिकारी यांचा समावेश आहे. ही संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी घेतला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य आणि नव्या स्वरूपात रचना करून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, आयआयटी, सिव्हिल इंजिनिअर्स, महाराष्ट्रातील (maharashtra) नामवंत शिल्पकारांची समिती तसेच नौदलातील तांत्रिक अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येणार. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. नौदल दिनानिमित्त नौदलाने राजकोटमध्ये हा पुतळा मोठ्या उत्साहात उभारला होता. भविष्यात असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव गृह इक्बालसिंग चहल, अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव नगररचना विभागाचे अधिकारी डॉ. विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ॲडमिरल अजय कोचर, रिअर ॲडमिरल मनीष चढ्ढा, आर्किटेक्ट राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.हेही वाचा मध्य-पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांना नवीन युनिफाइड पेन्शन योजनेचा लाभ होणार सिडकोतर्फे 902 घरांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण योजना

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यामागची कारणे शोधण्यासाठी समिती

मालवणच्या (malvan) राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (chhatrapati shivaji maharaj statue) काही दिवसांपूर्वीच कोसळला होता. आता याप्रकरणी राज्य सरकारने समितीची स्थापना केली आहे. ही समिती महाराजांचा पुतळा पडल्याची कारणे शोधणार आहे. पुतळा पडल्याची कारणे शोधून त्यासंदर्भात सविस्तर विश्लेषण करण्यात येणार. या समितीत अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी आणि नौदलाच्या अधिकारी यांचा समावेश आहे. ही संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी घेतला आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य आणि नव्या स्वरूपात रचना करून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, आयआयटी, सिव्हिल इंजिनिअर्स, महाराष्ट्रातील (maharashtra) नामवंत शिल्पकारांची समिती तसेच नौदलातील तांत्रिक अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येणार. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. नौदल दिनानिमित्त नौदलाने राजकोटमध्ये हा पुतळा मोठ्या उत्साहात उभारला होता. भविष्यात असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव गृह इक्बालसिंग चहल, अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव नगररचना विभागाचे अधिकारी डॉ. विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ॲडमिरल अजय कोचर, रिअर ॲडमिरल मनीष चढ्ढा, आर्किटेक्ट राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.हेही वाचामध्य-पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांना नवीन युनिफाइड पेन्शन योजनेचा लाभ होणारसिडकोतर्फे 902 घरांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण योजना

Go to Source