महापालिकेचे वांद्रे पूर्वेतील प्रदूषण नियमांकडे दुर्लक्ष?
वांद्रे पूर्व (bandra) येथील 90 एकर सरकारी वसाहतीत काही जुन्या इमारती पाडण्याचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना धुळीच्या प्रदूषणामुळे (air pollution) त्रास होत आहे.वायू प्रदूषण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) तर्फे ऑक्टोबर, 2023 मध्ये मार्गदर्शक तत्वे लागू केली गेली. पण या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून, 2 आणि 3 क्रमांकाच्या इमारती पाडल्या जात आहेत. हिरवे कापड आणि स्टील शीटने भुईसपाट केलेल्या जागेचे फक्त 10-फूट क्षेत्र कव्हर केले आहे, असे आरोप रहिवाश्यांकडून होत आहेत. तर नियमांनुसार साइटचे संपूर्ण क्षेत्र कव्हर करावे लागते. महापालिकेचा हा नियम सरकारी आणि खाजगी दोन्ही संस्थांना लागू होतो.ध्वनी आणि धूळ प्रदूषणाचा त्रास होणाऱ्या रहिवाशांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एच ईस्ट वॉर्ड ऑफिसला तक्रार पत्र पाठवले. परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.जवळील रहिवासी उमेश येळवे यांनी सांगितले. “माझ्या मुलांसह सर्वांना खोकला झाला आहे. धूळ प्रतिबंधित करण्यासाठी कोणतेही संरक्षणात्मक उपाययोजना नसल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून फार त्रास होत आहे.मोडकळीस आलेल्या इमारतींजवळील पाच छोट्या दुकानांनाही असाच फटका बसत आहे. ए टू झेड फॅब्रिकेशनचे दुकान मालक सुनील सोनी म्हणाले, “दुकानाच्या वर असलेले आमचे घर पाडणे सुरू झाल्यापासून हादरे बसत आहे.” “हवेतील धुळीमुळे श्वसनाचा त्रास होत असताना, पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू असलेला आवाजामुळे झोप मोड होत आहे.”35 वर्षांपूर्वी ज्यांचे दुकान बांधले होते, त्या सोनी यांनी सोमवारी एच पूर्व प्रभाग कार्यालयात तक्रार पत्र सादर केले. यामध्ये त्यांनी रहिवाशांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची माहिती दिली होती. आपली मालमत्ता गमावण्याच्या भीतीने ते येथेच राहत असल्याचे त्याने सांगितले. “आमच्याकडे सर्व कागदपत्रे असूनही, उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला 5 ऑगस्टला नोटीस दिली, की आमचे अनधिकृत दुकान दोन दिवसांत हटवा अन्यथा ते पाडले जातील. यापूर्वी सहा दुकाने पाडण्यात आली आहेत.वांद्रे शासकीय वसाहतीत वर्ग-1 ते वर्ग-4 श्रेणीत सरकारी कर्मचारी राहतात. हे 90 एकरमध्ये पसरलेले आहे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दरम्यान आहे. 1958 ते 1973 दरम्यान 370 इमारती, ज्यात 4782 फ्लॅट्स बांधण्यात आल्या आहेत. मे 2024 पर्यंत 68 इमारती खराब स्थितीत असल्याने पाडण्यात आल्या.वसाहतीच्या पुनर्विकास योजनेचा एक भाग म्हणून, 30 एकर जागा मुंबई (mumbai) उच्च न्यायालयासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर उर्वरित 60 एकर जागेवर प्रत्येकी 16 मजल्यांच्या 12 उंच इमारतींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील काही भाग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी वापरला जाईल. हेही वाचामुंबईत शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यतासेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ‘मंकीपॉक्स’साठी 14 खाटांचा विशेष वॉर्ड
Home महत्वाची बातमी महापालिकेचे वांद्रे पूर्वेतील प्रदूषण नियमांकडे दुर्लक्ष?
महापालिकेचे वांद्रे पूर्वेतील प्रदूषण नियमांकडे दुर्लक्ष?
वांद्रे पूर्व (bandra) येथील 90 एकर सरकारी वसाहतीत काही जुन्या इमारती पाडण्याचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना धुळीच्या प्रदूषणामुळे (air pollution) त्रास होत आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) तर्फे ऑक्टोबर, 2023 मध्ये मार्गदर्शक तत्वे लागू केली गेली. पण या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून, 2 आणि 3 क्रमांकाच्या इमारती पाडल्या जात आहेत. हिरवे कापड आणि स्टील शीटने भुईसपाट केलेल्या जागेचे फक्त 10-फूट क्षेत्र कव्हर केले आहे, असे आरोप रहिवाश्यांकडून होत आहेत.
तर नियमांनुसार साइटचे संपूर्ण क्षेत्र कव्हर करावे लागते. महापालिकेचा हा नियम सरकारी आणि खाजगी दोन्ही संस्थांना लागू होतो.
ध्वनी आणि धूळ प्रदूषणाचा त्रास होणाऱ्या रहिवाशांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एच ईस्ट वॉर्ड ऑफिसला तक्रार पत्र पाठवले. परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
जवळील रहिवासी उमेश येळवे यांनी सांगितले. “माझ्या मुलांसह सर्वांना खोकला झाला आहे. धूळ प्रतिबंधित करण्यासाठी कोणतेही संरक्षणात्मक उपाययोजना नसल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून फार त्रास होत आहे.
मोडकळीस आलेल्या इमारतींजवळील पाच छोट्या दुकानांनाही असाच फटका बसत आहे. ए टू झेड फॅब्रिकेशनचे दुकान मालक सुनील सोनी म्हणाले, “दुकानाच्या वर असलेले आमचे घर पाडणे सुरू झाल्यापासून हादरे बसत आहे.” “हवेतील धुळीमुळे श्वसनाचा त्रास होत असताना, पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू असलेला आवाजामुळे झोप मोड होत आहे.”
35 वर्षांपूर्वी ज्यांचे दुकान बांधले होते, त्या सोनी यांनी सोमवारी एच पूर्व प्रभाग कार्यालयात तक्रार पत्र सादर केले. यामध्ये त्यांनी रहिवाशांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची माहिती दिली होती. आपली मालमत्ता गमावण्याच्या भीतीने ते येथेच राहत असल्याचे त्याने सांगितले.
“आमच्याकडे सर्व कागदपत्रे असूनही, उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला 5 ऑगस्टला नोटीस दिली, की आमचे अनधिकृत दुकान दोन दिवसांत हटवा अन्यथा ते पाडले जातील. यापूर्वी सहा दुकाने पाडण्यात आली आहेत.
वांद्रे शासकीय वसाहतीत वर्ग-1 ते वर्ग-4 श्रेणीत सरकारी कर्मचारी राहतात. हे 90 एकरमध्ये पसरलेले आहे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दरम्यान आहे. 1958 ते 1973 दरम्यान 370 इमारती, ज्यात 4782 फ्लॅट्स बांधण्यात आल्या आहेत. मे 2024 पर्यंत 68 इमारती खराब स्थितीत असल्याने पाडण्यात आल्या.
वसाहतीच्या पुनर्विकास योजनेचा एक भाग म्हणून, 30 एकर जागा मुंबई (mumbai) उच्च न्यायालयासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर उर्वरित 60 एकर जागेवर प्रत्येकी 16 मजल्यांच्या 12 उंच इमारतींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील काही भाग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी वापरला जाईल. हेही वाचा
मुंबईत शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता
सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ‘मंकीपॉक्स’साठी 14 खाटांचा विशेष वॉर्ड