जीवघेणा लोकल प्रवास! 15 वर्षांत 52,348 प्रवाशांचा मृत्यू
पश्चिम रेल्वे (western railway) आणि मध्य रेल्वे (central railway) वर गेल्या 15 वर्षांत 52,348 हून अधिक लोकांचा मृत्यू (death) झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाला रेल्वेकडूनच ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात यतीन जाधव यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान पश्चिम आणि मध्य रेल्वेला उच्च न्यायालयाने शपथपत्रे दाखल करण्यास सांगितले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांनी शपथपत्रे दाखल केली.तसेच यावर पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या महाव्यवस्थापकांना सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टाने जारी केले आहेत. तसेच सॉलिसिटर जनरल यांना पुढील सुनावणीत कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश देखील हायकोर्टाने दिले आहेत.
उच्च न्यायालयाने जूनमध्ये असे नोंदवले होते की, ट्रेनमधून पडून मृत्यू होण्याच्या “अत्यंत गंभीर” समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. “तुम्ही गुरांसारखे लोकांना वाहून नेतात” असे म्हणत रेल्वेवर टीका केली होती. तसेच लोकल ट्रेनमधील मृत्यू (accident) रोखण्यासाठी अधिका-यांना “सशक्त” आधुनिक प्रणाली उभारण्यास सांगितले होते.मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय प्रणालीचा वापर संपूर्ण भारतीय रेल्वेवरील एकूण प्रवाशांपैकी एक तृतीयांश प्रवासी करतात. पश्चिम रेल्वेवर 23,027 लोकांनी आपले जीव गमावले, तर मध्य रेल्वेवर 2009 ते जून 2024 पर्यंत 29,321 मृत्यू झाले आहेत. रेल्वेने असेही म्हटले आहे की, ते नेटवर्क विस्तारासाठी सतत प्रयत्न करत आहेत. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार सर्व पायाभूत सुविधा अपग्रेड केल्यामुळे आणि नेटवर्क विस्तार आणि इतर उपायांमुळे (जसे की अधिक एफओबी, आरओबी, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण, वाढलेले रेक, ट्रॅक ओलांडण्याविरुद्ध कारवाई इ.) मृत्यू आणि दुखापतीच्या घटना गेल्या 20 वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत.हेही वाचाडॉक्टरांना तक्रार करण्यासाठी उपाययोजनेची मागणीमध्य-पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांना नवीन युनिफाइड पेन्शन योजनेचा लाभ होणार
Home महत्वाची बातमी जीवघेणा लोकल प्रवास! 15 वर्षांत 52,348 प्रवाशांचा मृत्यू
जीवघेणा लोकल प्रवास! 15 वर्षांत 52,348 प्रवाशांचा मृत्यू
पश्चिम रेल्वे (western railway) आणि मध्य रेल्वे (central railway) वर गेल्या 15 वर्षांत 52,348 हून अधिक लोकांचा मृत्यू (death) झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाला रेल्वेकडूनच ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात यतीन जाधव यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान पश्चिम आणि मध्य रेल्वेला उच्च न्यायालयाने शपथपत्रे दाखल करण्यास सांगितले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांनी शपथपत्रे दाखल केली.
तसेच यावर पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या महाव्यवस्थापकांना सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टाने जारी केले आहेत. तसेच सॉलिसिटर जनरल यांना पुढील सुनावणीत कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश देखील हायकोर्टाने दिले आहेत.उच्च न्यायालयाने जूनमध्ये असे नोंदवले होते की, ट्रेनमधून पडून मृत्यू होण्याच्या “अत्यंत गंभीर” समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. “तुम्ही गुरांसारखे लोकांना वाहून नेतात” असे म्हणत रेल्वेवर टीका केली होती. तसेच लोकल ट्रेनमधील मृत्यू (accident) रोखण्यासाठी अधिका-यांना “सशक्त” आधुनिक प्रणाली उभारण्यास सांगितले होते.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय प्रणालीचा वापर संपूर्ण भारतीय रेल्वेवरील एकूण प्रवाशांपैकी एक तृतीयांश प्रवासी करतात. पश्चिम रेल्वेवर 23,027 लोकांनी आपले जीव गमावले, तर मध्य रेल्वेवर 2009 ते जून 2024 पर्यंत 29,321 मृत्यू झाले आहेत. रेल्वेने असेही म्हटले आहे की, ते नेटवर्क विस्तारासाठी सतत प्रयत्न करत आहेत.
पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार सर्व पायाभूत सुविधा अपग्रेड केल्यामुळे आणि नेटवर्क विस्तार आणि इतर उपायांमुळे (जसे की अधिक एफओबी, आरओबी, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण, वाढलेले रेक, ट्रॅक ओलांडण्याविरुद्ध कारवाई इ.) मृत्यू आणि दुखापतीच्या घटना गेल्या 20 वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत.हेही वाचा
डॉक्टरांना तक्रार करण्यासाठी उपाययोजनेची मागणी
मध्य-पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांना नवीन युनिफाइड पेन्शन योजनेचा लाभ होणार