नवी मुंबईतील 47 शाळांमध्ये सीसीटीव्ही नाही

नवी मुंबई (navi mumbai) महापालिकेच्या 430 शाळांपैकी 383 शाळांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा कार्यान्वित आहे. पालिकेकडूनच या संदर्भात माहिती देण्यात आला आहे.  नवी मुंबई महापालिकेने गुरुवारी शाळांकडून सीसीटीव्ही यंत्रणा आणि विविध समित्यांकडून लिंकद्वारे अहवाल मागवला असून अद्यापही संपूर्ण अहवाल प्राप्त झालेला नाही.  मुलांच्या सुरक्षेसाठी आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने 2022 मध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. पण शहरातील किती महापालिका आणि खासगी शाळांमध्ये (schools) ही समिती आहे, याबाबत साशंकता आहे. नवी मुंबई महापालिकेच्या (nmmc) शिक्षण विभागाने शाळांना सखी समिती स्थापन करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या लिंकमध्ये जवळपास 47 शाळांनी सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती पाठवली नाही.  नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने या संदर्भात शहरातील सर्व शाळांना पत्र लिहून तक्रार पेटी व सखी सावित्री समितीला तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले होते. काही शाळांमधील सीसीटीव्हीची माहितीच मिळाली नसल्याने पालिकेने याबाबत योग्य ती खबरदारी घेणे अपेक्षित आहे. शालेय स्तरावर सखी सावित्री समितीची स्थापना करताना त्या समितीमध्ये 10 सदस्य असतात आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतात. शहरातील सखी सावित्री समिती (sakhi savitri committe) आणि विशाखा (vishakha)समितीची अद्ययावत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. दर महिन्याला सखी सावित्री समिती व विशाखा समितीची बैठक आयोजित करणे आवश्यक आहे. मात्र राज्य शासन स्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण तरीही या समित्या किती शाळांमध्ये आहेत हा मुद्द्याचा विषय आहे. कारण पालिकेने गोळा केलेल्या माहितीत पहिल्या दिवशी समिती स्थापन करणाऱ्यांची संख्या कमी होती.हेही वाचा 28 आणि 29 ऑगस्टच्या मध्यरात्री 22 लोकल गाड्या रद्द सिडकोतर्फे 902 घरांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण योजना

नवी मुंबईतील 47 शाळांमध्ये सीसीटीव्ही नाही

नवी मुंबई (navi mumbai) महापालिकेच्या 430 शाळांपैकी 383 शाळांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा कार्यान्वित आहे. पालिकेकडूनच या संदर्भात माहिती देण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेने गुरुवारी शाळांकडून सीसीटीव्ही यंत्रणा आणि विविध समित्यांकडून लिंकद्वारे अहवाल मागवला असून अद्यापही संपूर्ण अहवाल प्राप्त झालेला नाही. मुलांच्या सुरक्षेसाठी आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने 2022 मध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. पण शहरातील किती महापालिका आणि खासगी शाळांमध्ये (schools) ही समिती आहे, याबाबत साशंकता आहे.नवी मुंबई महापालिकेच्या (nmmc) शिक्षण विभागाने शाळांना सखी समिती स्थापन करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या लिंकमध्ये जवळपास 47 शाळांनी सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती पाठवली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने या संदर्भात शहरातील सर्व शाळांना पत्र लिहून तक्रार पेटी व सखी सावित्री समितीला तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले होते.काही शाळांमधील सीसीटीव्हीची माहितीच मिळाली नसल्याने पालिकेने याबाबत योग्य ती खबरदारी घेणे अपेक्षित आहे. शालेय स्तरावर सखी सावित्री समितीची स्थापना करताना त्या समितीमध्ये 10 सदस्य असतात आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतात.शहरातील सखी सावित्री समिती (sakhi savitri committe) आणि विशाखा (vishakha)समितीची अद्ययावत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. दर महिन्याला सखी सावित्री समिती व विशाखा समितीची बैठक आयोजित करणे आवश्यक आहे. मात्र राज्य शासन स्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण तरीही या समित्या किती शाळांमध्ये आहेत हा मुद्द्याचा विषय आहे. कारण पालिकेने गोळा केलेल्या माहितीत पहिल्या दिवशी समिती स्थापन करणाऱ्यांची संख्या कमी होती.हेही वाचा28 आणि 29 ऑगस्टच्या मध्यरात्री 22 लोकल गाड्या रद्दसिडकोतर्फे 902 घरांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण योजना

Go to Source