देशातील 31 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानुसार सौराष्ट्र आणि कच्छवरील खोल दाबाचे क्षेत्र 30 ऑगस्ट रोजी पूर्व अरबी समुद्रात चक्री वादळात बदलू शकते. तसेच त्यामुळे 30 ते 4 सप्टेंबर या कालावधीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली

देशातील 31 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानुसार सौराष्ट्र आणि कच्छवरील खोल दाबाचे क्षेत्र 30 ऑगस्ट रोजी पूर्व अरबी समुद्रात चक्री वादळात बदलू शकते. तसेच त्यामुळे 30 ते 4 सप्टेंबर या कालावधीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हवामान खात्याने येणाऱ्या सहा दिवसांत 31 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच शुक्रवारी ओडिशा आणि तेलंगणामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि छत्तीसगड, केरळ, तटीय आंध्र प्रदेश, कर्नाटक मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा-

हवामान विभागानुसार सौराष्ट्र आणि कच्छवरील खोल दाबाचे क्षेत्र 30 ऑगस्ट रोजी पूर्व अरबी समुद्रात चक्री वादळात बदलू शकते. त्यामुळे 30 ते 4 सप्टेंबर या कालावधीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

तसेच ओडिशा, तटीय कर्नाटक, केरळ, उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, पूर्व-पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तराखंड आणि राजस्थान येथे पुढील सहा दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source