टेंगीनकेरा गल्लीतील व्यायाम शाळेला मनपा नोटीस बजावणार

अधिकाऱ्यांची भेट, पाच दिवसात उत्तर देण्याची संबंधितांना सूचना बेळगाव : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत मालमत्तांच्या विषयावरून गंभीर चर्चा झाली होती. याची दखल घेण्यात आली असून मनपा अधिकाऱ्यांनी मनपाच्या मालमत्तांची पाहणी मोहीम हाती घेतली आहे. टेंगीनकेरा गल्ली येथील मनपाच्या इमारतीमध्ये व्यायाम शाळा व महिला संघाला जागा देण्यात आली आहे. यावरून सदर जागेची पाहणी करून संबंधित व्यायाम शाळा संघाला व महिला संघाला नोटीस बजावण्याचा […]

टेंगीनकेरा गल्लीतील व्यायाम शाळेला मनपा नोटीस बजावणार

अधिकाऱ्यांची भेट, पाच दिवसात उत्तर देण्याची संबंधितांना सूचना
बेळगाव : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत मालमत्तांच्या विषयावरून गंभीर चर्चा झाली होती. याची दखल घेण्यात आली असून मनपा अधिकाऱ्यांनी मनपाच्या मालमत्तांची पाहणी मोहीम हाती घेतली आहे. टेंगीनकेरा गल्ली येथील मनपाच्या इमारतीमध्ये व्यायाम शाळा व महिला संघाला जागा देण्यात आली आहे. यावरून सदर जागेची पाहणी करून संबंधित व्यायाम शाळा संघाला व महिला संघाला नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत टेंगीनकेरा गल्ली येथील मनपाच्या इमारतीमध्ये व्यायाम शाळा व महिला संघाला जागा उपलब्ध करून देण्यात आल्यावरून नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला होता. यावर सभागृहामध्ये वादळी चर्चा झाली होती.
याची दखल घेऊन मनपा अधिकाऱ्यांनी टेंगीनकेरा गल्ली येथील मनपाच्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी व्यायाम शाळा सुरू असून रिद्धी सिद्धी महिला संघाला जागा देण्यात आली आहे. सदर जागा कोणत्या आधारावर देण्यात आली आहे, याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. संबंधितांकडून माहिती घेऊन पाच दिवसांमध्ये याबाबतची कागदपत्रे हजर करण्याची सूचना केली आहे. सदर जागा वापरत असलेल्या संबंधितांना नोटीस देण्यात येणार असून नोटिसीला उत्तर देण्यासाठी सूचित केले आहे. त्यामुळे मनपा अधिकारी अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. सभागृहातील चर्चेची दखल घेऊन मनपातील इतर मालमत्तांनाही भेट दिली असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.