विदर्भामध्ये 1.67 करोडचे नकली खत, बीज आणि कीटनाशक जप्त, 15 जणांविरोधात केस दाखल

विदर्भामध्ये 1.67 करोडचे नकली खत, बीज आणि कीटनाशक जप्त, 15 जणांविरोधात केस दाखल

नागपूर तसेच पूर्ण विदर्भात नकली खतांचे रॅकेट सक्रिय आहे. इथे असली पॅकेट मध्ये नकली बीज भरून विकले जात आहे. विदर्भामध्ये कमीतकमी 1 करोड 67 लाखांचे खत, बीज आणि कीटनाशक जप्त करण्यात आले आहे. कमीतकमी 15 जणांविरुद्ध केस दाखल झाली आहे.

 

नागपूर सोबत पूर्ण विदर्भामध्ये पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतात बीज पेरण्याकरिता खरेदीस सुरवात केली आहे. या कपाशीच्या बियांचा काळा बाजार समोर आल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. विदर्भामध्ये कपाशीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कृषी विभागाने पोलिसानसोबत संयुक्त अभियानमध्ये कमीतकमी दीड करोड रुपयांचे नकली बीज, कृषि साहित्य जप्त केले आहे. नागपुर, चंद्रपुर येथे आरोपींजवळून 76 क्विंटल नकली बीज सहित 1 करोड 67 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

 

नकली कृषी साहित्य विकणाऱ्या या 15 जणांविरुद्ध केस दाखल होऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 70 गोदामांची चौकशी करण्यात आली. येथील 150 नमुन्यांची चौकशी सुरु आहे.  

 

एक महिन्याच्या आत  नागपुर, अमरावती, चंद्रपुर, भंडारा आणि इतर जिल्ह्यांची वेगवेगळ्या ठिकाणी कृषी विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच अनेक टन नकली बीज जप्त केले आहे.  

Go to Source