चेन पुलिंगच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वेच्या चिंतेत वाढ

रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, परंतु या अलार्म साखळीच्या गैरवापरामुळे गाड्यांच्या वक्तशीरपणावरही परिणाम होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता अशा प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. चेन पुलिंगची हजारो प्रकरणे मध्य रेल्वेकडून अनुचित अलार्म चेन पुलिंग (ACP) घटनांवर कडक कारवाई केली जात आहे. एप्रिल 2023 ते जून 2024 (28.6.2024 पर्यंत), मध्य रेल्वेने अलार्म चेन गैरवापराची 11,434 प्रकरणे नोंदवली. रेल्वे कायद्याच्या कलम 141 अंतर्गत 9,657 जणांवर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 63.21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापैकी मुंबई विभागात 4 हजार 387 एसीपी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 3741 जणांवर कारवाई करण्यात आली असून 23.47 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेने एसीपीचे नियम सांगितले अलार्म चेन खेचण्याच्या कायदेशीर कारणांमध्ये आपत्कालीन परिस्थितींचा समावेश आहे जसे की आगीच्या घटना, आरोग्य संबंधित समस्या, एखादा गुन्हा किंवा ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना अपघात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या परिस्थितींकडे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिवाय, एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी चेन पुलिंगचा गैरवापर केल्यास इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांना आवाहन बऱ्याचदा एक्स्प्रेस पकडण्यास उशीर झाला तरीही चेन पुलिंग केले जाते. सर्व प्रवाशांनी नियोजित सुटण्याच्या किमान तीस मिनिटे आधी स्थानकावर पोहोचण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. प्रवासी वेळेत आले तर त्यांचासाठी देखील सोईस्कर असेल आणि रेल्वेचे देखील वेळापत्रक विघडणार नाही. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थिती नसेल तर पर्यायी माध्यमांचा वापर करावा, जसे की रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क करणे, प्रवासी तिकीट परीक्षक (TTE), 139 वर रेल्वे मदत डायल करणे किंवा सहप्रवाशांची मदत घेणे. मध्य रेल्वेवर चेन पुलिंग प्रकरणेएप्रिल 2023 ते जून 2024 11,434 प्रकरणे 9,657 जणांवर गुन्हा दाखल 63.21 लाख रुपयांचा दंड वसूलएसीपीविरुद्ध मुंबई विभागात गुन्हे दाखल4,387 गुन्हे दाखल 3,741 जणांवर कारवाई 23.47 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाहेही वाचा प्लॅस्टिक फुलांच्या बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र-राज्यांकडून मागितले उत्तरमध्य रेल्वेच्या आषाढी यात्रेसाठी 64 विशेष गाड्या

चेन पुलिंगच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वेच्या चिंतेत वाढ

रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, परंतु या अलार्म साखळीच्या गैरवापरामुळे गाड्यांच्या वक्तशीरपणावरही परिणाम होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता अशा प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.चेन पुलिंगची हजारो प्रकरणेमध्य रेल्वेकडून अनुचित अलार्म चेन पुलिंग (ACP) घटनांवर कडक कारवाई केली जात आहे. एप्रिल 2023 ते जून 2024 (28.6.2024 पर्यंत), मध्य रेल्वेने अलार्म चेन गैरवापराची 11,434 प्रकरणे नोंदवली.रेल्वे कायद्याच्या कलम 141 अंतर्गत 9,657 जणांवर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 63.21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापैकी मुंबई विभागात 4 हजार 387 एसीपी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 3741 जणांवर कारवाई करण्यात आली असून 23.47 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रेल्वेने एसीपीचे नियम सांगितलेअलार्म चेन खेचण्याच्या कायदेशीर कारणांमध्ये आपत्कालीन परिस्थितींचा समावेश आहे जसे की आगीच्या घटना, आरोग्य संबंधित समस्या, एखादा गुन्हा किंवा ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना अपघात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या परिस्थितींकडे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिवाय, एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी चेन पुलिंगचा गैरवापर केल्यास इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.प्रवाशांना आवाहनबऱ्याचदा एक्स्प्रेस पकडण्यास उशीर झाला तरीही चेन पुलिंग केले जाते. सर्व प्रवाशांनी नियोजित सुटण्याच्या किमान तीस मिनिटे आधी स्थानकावर पोहोचण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. प्रवासी वेळेत आले तर त्यांचासाठी देखील सोईस्कर असेल आणि रेल्वेचे देखील वेळापत्रक विघडणार नाही. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थिती नसेल तर पर्यायी माध्यमांचा वापर करावा, जसे की रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क करणे, प्रवासी तिकीट परीक्षक (TTE), 139 वर रेल्वे मदत डायल करणे किंवा सहप्रवाशांची मदत घेणे.मध्य रेल्वेवर चेन पुलिंग प्रकरणेएप्रिल 2023 ते जून 2024 11,434 प्रकरणे9,657 जणांवर गुन्हा दाखल63.21 लाख रुपयांचा दंड वसूलएसीपीविरुद्ध मुंबई विभागात गुन्हे दाखल4,387 गुन्हे दाखल3,741 जणांवर कारवाई23.47 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाहेही वाचाप्लॅस्टिक फुलांच्या बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र-राज्यांकडून मागितले उत्तर
मध्य रेल्वेच्या आषाढी यात्रेसाठी 64 विशेष गाड्या

Go to Source