वडणगे येथे विद्युत तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू…

वडणगे येथे विद्युत तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू…

प्रयाग चिखली वार्ताहर

वडणगे येथे शेतातील गवताला लागवड टाकावयास गेलेल्या विक्रम संजय साखळकर (वय 32) या तरुण शेतकऱ्याला शेतामध्ये तुटून पडलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा शॉक बसल्याने तो मृत्यू पावल्याची घटना आज सोमवारी सायंकाळी चार च्या सुमारास घडली. घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी मयत विक्रम संजय साखळकर हा तरुण शेतकरी व त्याचे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून येथील साखरकर मळ्यात राहतात. विक्रम हा शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय देखील करत होता आज दुपारी चारच्या सुमारास जनावरांसाठी नाडगुंडी नावाच्या शेतामध्ये बांधावर लावलेल्या हत्ती गवताला लागवड टाकण्यासाठी विक्रम एका बुट्टी मध्ये लागवड घेऊन बांधावरून निघाला होता. घरापासून काही अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी उच्च दाबाची विद्युत तार तुटून पडली होती. विक्रमच्या ते लक्षात आले नाही त्यावेळी अचानक उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला त्याचा स्पर्श झाल्याने शॉक बसला त्यावेळी तो ४-५ फूट उडाला आणि त्याच तारेवर पडला दरम्यान तो मोठ्याने ओरडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काहीजण मदतीसाठी धावले त्यावेळी तो तारेवर निश्चित पडला होता त्याच्या मदतीसाठी काहीजण धावले यावेळी विक्रमला उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील लोकांनी सावध पवित्रा घेऊन विक्रमला उच्च दाबाच्या तारेपासून बाजूला ओढले त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सीपीआरला हलवण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आला. विक्रमला आई वडील पत्नी व दोन मुली आहेत शेतामध्ये तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन
गेल्या आठवड्याभरात कोपार्डे तसेच नागाव आणि आज वडणगे अशा घटनांमध्ये चार तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैव अंत झाला त्यामुळे सर्वत्र महावितरण च्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुलींची पाचवी-वडीलांचा अंत
शॉक बसून मयत पावलेल्या विक्रमला दोन मुली आहेत चार दिवसांपूर्वी त्याच्या दुसऱ्या मुलीचा जन्म झाला आहे. मुलीच्या जन्मामुळे घरात आनंदाची लहर आली होती एकीकडे मुलीच्या पाचवी पुजनाची लगबग चालू असतानाच विक्रमचा दुर्दैवी अंत झाला.
शॉकमुळे तरुण चार शेतकऱ्यांचा मृत्यू
गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील कोपर्डे नागाव वडणगे या ठिकाणच्या चार तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू महावितरणच्या तारेचा शॉक लागून झाला त्यामुळे महावितरणच्या गलथांक कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे