मिराबा, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था /बँकॉक विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या थायलंड खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचा नवोदित बॅडमिंटनपटू 21 वर्षीय मिराबा मेसनामने तर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीत गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात मिराबा मेसनामने डेन्मार्कच्या मॅड्स ख्रिस्टोफर्सनचा 21-14, 22-20 […]

मिराबा, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था /बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या थायलंड खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचा नवोदित बॅडमिंटनपटू 21 वर्षीय मिराबा मेसनामने तर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीत गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात मिराबा मेसनामने डेन्मार्कच्या मॅड्स ख्रिस्टोफर्सनचा 21-14, 22-20 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. या स्पर्धेत पहिल्या फेरीतील सामन्यात मिराबाने भारताच्या एच. एस. प्रणॉयला पराभवाचा धक्का दिला होता. मिराबाला विजयासाठी 50 मिनिटे झगडावे लागले. 2022 साली मिराबाने इराण फेजर आंतरराष्ट्रीय आणि इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत मिराबाची लढत थायलंडच्या विश्वविजेत्या के. विटीडेसमशी होणार आहे. पुरुष दुहेरीच्या सामन्यात तृतीय मानांकित जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी झी साओ नेन आणि झेंग वेई हेन यांचा 21-16, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी जोडी सात्विक आणि चिराग यांचा पुढील फेरीत सामना मलेशियाच्या अरीफ व रॉय किंग येपशी होणार आहे. महिला एकेरीत भारताच्या अस्मिता छलियाचे आव्हान चीनच्या टॉप सिडेड हेन युईने संपुष्टात आणले. युईने हा सामना 21-15, 12-21, 21-12 असा जिंकून पुढील फेरीत स्थान मिळविले. मिश्र दुहेरीत रिनोव रिव्हाल्डी आणि मेंतारीया जोडीने भारताच्या सतीश करुणाकरन व अध्या वेरीयात यांचा 21-10, 21-17 असा पराभव केला.