द.आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या गणेश पाटीलचा सत्कार

बेळगाव : मालदिव येथे झालेल्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या गणेश पाटीलने ज्युनिअर गटात व वरिष्ठ गटात कास्य पदक पटकावित यश संपादन केल्यामुळे उद्योगपती शिरीष गोगटे यांच्यातर्फे खास सत्कार करण्यात आला. मालदिव येथे वर्ल्ड बॉडिबिल्डिंग फेडरेशन व एशियन बॉडिबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या साऊथ एशियन बॉडिबिल्डिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बेळगाव, कर्नाटकचा शरीरसौष्ठवपटू गणेश राजू […]

द.आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या गणेश पाटीलचा सत्कार

बेळगाव : मालदिव येथे झालेल्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या गणेश पाटीलने ज्युनिअर गटात व वरिष्ठ गटात कास्य पदक पटकावित यश संपादन केल्यामुळे उद्योगपती शिरीष गोगटे यांच्यातर्फे खास सत्कार करण्यात आला. मालदिव येथे वर्ल्ड बॉडिबिल्डिंग फेडरेशन व एशियन बॉडिबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या साऊथ एशियन बॉडिबिल्डिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बेळगाव, कर्नाटकचा शरीरसौष्ठवपटू गणेश राजू पाटीलने ज्युनियर गटात 75 किलोच्या आतील वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारत कास्य पदक पटकाविले. तर याच स्पर्धेत वरिष्ठ गटात 70 किलो वजनी गटात भाग घेत अंतिम फेरीत मजल मारून कास्य पदक पटकाविले.
एकाच स्पर्धेत दोन विभागात पदके पटकाविणारा गणेश हा बेळगावचा पहिला शरीरसौष्ठवपटू आहे. यापूर्वी गणेशने केरळ येथे झालेल्या साऊथ इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत आपल्या गटात चौथा क्रमांक पटकाविला होता. तर दिल्ली येथे झालेल्या ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावित. ज्युनियर मिस्टर इंडिया हा किताब पटकाविला होता. त्याची दखल घेऊन साऊथ एशियन स्पर्धेसाठी गणेश पाटीलची निवड झाली होती. या यशानंतर बेळगावचे उद्योगपती शिरीष गोगटे, आशिया पंच अजित सिद्दण्णावर, हेमंत हावळ व सुनील पवार आदी मान्यवरांच्या हस्ते गणेश पाटीलचा खास सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.