युनियन जिमखाना, हुबळी स्पोर्टस्, बिडीके विजयी

केएससीए 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा  बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक 16 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून युनियम जिमखाना संघाने हुबळी क्रिकेट क्लब बी संघाचा 8 गड्यांनी, बीडीके अ संघाने श्रीसिध्दारुढ स्वामी स्पोर्टस् क्लब अ संघाचा तर हुबळी स्पोर्टस् क्लब अ संघाने भटकळ स्पोर्टस् क्लब अ चा […]

युनियन जिमखाना, हुबळी स्पोर्टस्, बिडीके विजयी

केएससीए 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा 
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक 16 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून युनियम जिमखाना संघाने हुबळी क्रिकेट क्लब बी संघाचा 8 गड्यांनी, बीडीके अ संघाने श्रीसिध्दारुढ स्वामी स्पोर्टस् क्लब अ संघाचा तर हुबळी स्पोर्टस् क्लब अ संघाने भटकळ स्पोर्टस् क्लब अ चा 131 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. महम्मद हामजा सराफ (जिमखाना), सिध्दलिंग, हर्षा सनकी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. ऑटोनगर बेळगाव येथील केएससीए क्रिकेट स्टेडीयमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्टस् क्लब बी संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्व गडी बाद 185 धावा केल्या.
त्यात रिधम रंजनने 4 चौकारासह नाबाद 45, अमृत रेवणकरने 3 चौकारासह 30, यश ठाकुरने 2 चौकारासह 29, निरज देशनूरने 14 तर किशन काटानाईकने 12 धावा केल्या. जिमखानातर्फे महम्मद हामजा सराफने 32 धावांत 4, अतिती भोगणने 35 धावांत 2 तर निच्छल हिरेमठ, औदुंबर एच., विख्यात के. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 31.5 षटकात 2 गडी बाद 186 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात महम्मद हामजाने 5 चौकारासह नाबाद 64, आर्यन मुरुडकरने 3 चौकारासह नाबाद 38, जयप्रकाश यादवने 2 चौकारासह 27, साईराज पोरवालने 18 धावा केल्या. हुबळीतर्फे कुशल बयाळ व अमृत रेवणकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
केएससी हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्टस् क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 33 षटकांत सर्व गडी बाद 243 धावा केल्या. त्यात सिधू यलबुर्गीने 8 चौकारासह 55, अक्षय मुलवीने 1 षटकार, 5 चौकारासह 39, राघव शर्माने 5 चौकारासह 31, मारुफ नदाफने 5 चौकारासह 26 तर युवराज वी.ने 10 धावा केल्या. भटकळतर्फे आक्रम काझीने 51 धावांत 5, आर्यन अलीबापुने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भटकळ संघाचा डाव 37.3 षकटात 111 धावांत आटोपला. त्यात अब्दान अकीरकीने 4 षटकार, 8 षटकारासह नाबाद 86 धावा केल्या. हुबळीतर्फे पवन यलगारने 17 धावांत 4, मनीषने 18 धावांत 3, युवराजने 16 धावांत 2 गडी बाद केले. आर. एस. हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्री सिध्दारुढ स्वामी स्पोर्टस् क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 17.4 षटकात सर्व गडी बाद 48 धावा केल्या. त्यात शौर्य सिद्रायनने 4 धावा केल्या. बीडीकेतर्फे हर्षा सनकीने 7 धावांत 5, निशांत कुरबर, शमुख यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीकेने 9 षटकांत बिनबाद 51 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. त्यात प्रितम गुलगंजी व अपूर्व सुतार यांनी 3 चौकारांसह नाबाद प्रत्येकी 17 धावा केल्या.