माझ्या निवडणुकीत मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला – कल्याण काळे

जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवेंना पराभूत करणाऱ्या कल्याण काळेंनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. निवडून आल्यानंतर जरांगे पाटील यांची भेट घ्यावी, या उद्देशाने आंतरवालीमध्ये आलो होतो, अशी प्रतिक्रिया कल्याण काळेंनी दिली.

माझ्या निवडणुकीत मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला – कल्याण काळे

जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवेंना पराभूत करणाऱ्या कल्याण काळेंनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.

 

निवडून आल्यानंतर जरांगे पाटील यांची भेट घ्यावी, या उद्देशाने आंतरवालीमध्ये आलो होतो, अशी प्रतिक्रिया कल्याण काळेंनी दिली.

 

कल्याण काळे म्हणाले, “माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील.”

 

जरांगे पाटील यांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार असल्याचंही खासदार काळे म्हणाले.

 

काळे म्हणाले, “माझ्या निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या विरोधात बोलले असतील तर ते चुकीचे आहे.”

Go to Source