महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक पुढे ढकलल्या
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई नाशिक शिक्षक या चार मतदार संघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 10 जून रोजी होणाऱ्या निवडणुका अनिश्चित काळासाठी भारत निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहे. या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या नंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन आले आहे.
या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. भारत निवडणूक आयोगाने अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. या निवडणुकीमुळे महायुती आणि माविआ पुन्हा आमने सामने येणार आहे.
Edited by – Priya Dixit