महांतेश कवटगीमठ यांची कर्ले गावाला भेट

महांतेश कवटगीमठ यांची कर्ले गावाला भेट

झाड कोसळून मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिला धीर
किणये : दुचाकीवरून गवंडी कामाला जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेले झाड दुचाकीवर कोसळून कर्ले गावातील दोन तऊण ठार झाले. ही घटना बेळगुंदी स्मशानभूमीजवळ घडली होती. विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी बुधवारी रात्री कर्ले गावातील त्या तऊणांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कर्ले गावातील सोमनाथ राहुल मुचंडीकर व विठ्ठल कृष्णा तळवार हे दोघे तऊण ठार झाले. तर अन्य एकजण जखमी झाला.
यामुळे गावातील दोन तऊणांचा असा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली तर सदर कुटुंब हतबल झाले आहेत. विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी या दोन्ही कुटुंबीयांची भेट घेतली. शासनाकडून मिळणारा निधी आपण लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबीयांना सांगितले. तसेच त्यांच्या घरातील अन्य तऊणांना सरकारी नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करणार असेही त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत माजी महापौर शिवाजी सुंठकर हे उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, वसंत सांबरेकर, सी. ए. सांबरेकर, नवनाथ खामकर, नरसिंग देसाई, बाळू कुंदप आदींसह गावकरी उपस्थित होते.