लोककल्प फौंडेशनतर्फे‘बावा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्यावतीने बेलगाम अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या (बावा) सदस्यांचा मंगळवारी सन्मान करण्यात आला. अपघातग्रस्त तसेच आजारी जनावरांवर उपचार करून त्यांना दत्तक स्वरुपात इतरांना देण्यासाठी ही संस्था काम करते. मागील काही वर्षांमध्ये या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन लोककल्प फौंडेशनतर्फे त्यांच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकमान्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, संतोष […]

लोककल्प फौंडेशनतर्फे‘बावा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्यावतीने बेलगाम अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या (बावा) सदस्यांचा मंगळवारी सन्मान करण्यात आला. अपघातग्रस्त तसेच आजारी जनावरांवर उपचार करून त्यांना दत्तक स्वरुपात इतरांना देण्यासाठी ही संस्था काम करते. मागील काही वर्षांमध्ये या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन लोककल्प फौंडेशनतर्फे त्यांच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकमान्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, संतोष कृष्णाचे, रिजनल मॅनेजर एम. एम. पाटील, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील, लोककल्प फोंडेशनच्या सीएसआर मॅनेजर मालिनी बाली आदी उपस्थित होते. बावा संघटनेचे संचालक वरुण कारखानीस, सुनिती जैन, प्रमोद कदम, अश्वगंधा गौरगोंडा या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना वरुण कारखानीस यांनी आपल्या संघटनेविषयी माहिती दिली.  अपघातग्रस्त जनावरांवर उपचार करताना कशा पद्धतीने अडचणींचा सामना करावा लागतो, याची माहिती दिली. असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील यांनी बावा संघटनेच्या कार्याचे कौतुक करून इतर तरुणांनीही अशा संघटनांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून लोककल्प फौंडेशन खानापूर तालुक्यातील दुर्गम भागामध्ये शैक्षणिक साहित्य, आरोग्य सुविधा तसेच इतर उपक्रम राबवित आहे. समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना फौंडेशनच्या माध्यमातून गौरव करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. यावेळी लोककल्प फौंडेशन तसेच लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.