लिव्हिंगस्टोन मायदेशी रवाना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधीत्व करणारा इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन मायदेशी रवाना झाला. गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर वैद्यकिय इलाज करवून घेण्यासाठी त्याने आयपीएल स्पर्धा अर्धवट सोडून लंडनमध्ये दाखल झाला आहे. जून महिन्यात आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमान पदाने होत असल्याने या स्पर्धेसाठी […]

लिव्हिंगस्टोन मायदेशी रवाना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधीत्व करणारा इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन मायदेशी रवाना झाला. गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर वैद्यकिय इलाज करवून घेण्यासाठी त्याने आयपीएल स्पर्धा अर्धवट सोडून लंडनमध्ये दाखल झाला आहे.
जून महिन्यात आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमान पदाने होत असल्याने या स्पर्धेसाठी तंदुरूस्त राहण्याकरीता लिव्हिंगस्टोनने या दुखापतीवर अधिक लक्ष दिले आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघातील जोस बटलर आरसीबी संघातील जॅक्स आणि टॉप्ले यांनीही आयपीएल स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी दाखल झाले आहेत. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 मालिका 22 मेपासून खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघामध्ये या सर्व खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्सचे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दोन सामने बाकी आहेत. त्यांचा एक सामना पंजाब संघाबरोबर 15 मे रोजी होत आहे. पंजाबचा शेवटचा सामना हैदराबाद संघाबरोबर 19 मे रोजी खेळविला जाणार असून या दोन्ही सामन्यात लिव्हिंगस्टोन उपलब्ध होऊ शकणार नाही.