लिंगायत राष्ट्रीय महिला मेळाव्याचे 27 पासून आयोजन

राज्यातील विविध मठांच्या महिला मठाधीश उपस्थित राहणार बेळगाव : जागतिक लिंगायत महासभेतर्फे राष्ट्रीय लिंगायत महिला मेळाव्याचे आयोजन दि. 27 व 28 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या मेळाव्याला राज्यातील विविध मठांच्या महिला मठाधीश उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये लिंगायत महिलांना सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्यावर अनुसरून असणाऱ्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष […]

लिंगायत राष्ट्रीय महिला मेळाव्याचे 27 पासून आयोजन

राज्यातील विविध मठांच्या महिला मठाधीश उपस्थित राहणार
बेळगाव : जागतिक लिंगायत महासभेतर्फे राष्ट्रीय लिंगायत महिला मेळाव्याचे आयोजन दि. 27 व 28 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या मेळाव्याला राज्यातील विविध मठांच्या महिला मठाधीश उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये लिंगायत महिलांना सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्यावर अनुसरून असणाऱ्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष ए. वाय. भेंडिगेरी, अशोक मळगली, एस. जी. सिदनाळ आदी उपस्थित होते. उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रामध्ये आरक्षण देण्यात आले आहे. लिंगायत धर्मामध्ये असणाऱ्या अंतर्गत जातींकडून हिंदू शब्दाचा उपयोग करून घेऊन अनेक आघातकारी घटना समोर येत आहेत. यावर रोख लावण्यासाठी महिलांमध्ये स्वाभिमान जागृती करण्यासाठी या मेळाव्याची आवश्यकता आहे.
लिंगायत धर्म, तत्त्व, साहित्य, संस्कृती महत्त्वाच्या विषयांसह बसवाण्णांच्या वचन साहित्याला व्यापक प्रचार मिळावा, यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे. भविष्यामध्ये जनगणती व जातगणती झाल्यास लिंगायत धर्म, समाज त्याचे अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. आदी विषयांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या मेळाव्यात चार सत्रांमध्ये विशेष चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. लिंगायत महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संघटना करण्यामध्ये महिला राजकारण्यांचे पात्र, लिंगायत धर्म शरणतत्त्व अनुष्ठानामध्ये महिला मठाधीशांचे पात्र, वचन साहित्य संशोधन, प्रसार आणि प्रचार यामध्ये लिंगायत महिलांचे पात्र अशा विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहे.