शाहू महाराजांविषयी चुकीचे मेसेज…वैयक्तिक टीका होणे अपेक्षित नाही- सतेज पाटील

कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर वैयक्तीक पातळीवर टिका होणे अपेक्षित नसून आम्ही आमच्या पातळीवर तशा सुचना दिल्या आहेत. पण शाहू महाराजांविषयी चुकीचे मॅसेज पसरवण्याची सुरवात हि विरोधकांकडून होत असल्याची टिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तसेच हि वैचारिक लढाई असल्याने त्यामध्य़े शाहू महाराजांनी उतरावे अशी इच्छा कोल्हापूरकरांची होती असेही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. […]

शाहू महाराजांविषयी चुकीचे मेसेज…वैयक्तिक टीका होणे अपेक्षित नाही- सतेज पाटील

कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर वैयक्तीक पातळीवर टिका होणे अपेक्षित नसून आम्ही आमच्या पातळीवर तशा सुचना दिल्या आहेत. पण शाहू महाराजांविषयी चुकीचे मॅसेज पसरवण्याची सुरवात हि विरोधकांकडून होत असल्याची टिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तसेच हि वैचारिक लढाई असल्याने त्यामध्य़े शाहू महाराजांनी उतरावे अशी इच्छा कोल्हापूरकरांची होती असेही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
पहा VIDEO >>> दोन्ही बाजूकडून वैयक्तिक टीका होणे अपेक्षित नाही- सतेज पाटील
गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूरात राजकिय आरोपांनी उचल खाल्ली आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारांमध्ये शाहू महारांजाना जाणिवपुर्वक निवडणुकीमध्ये उतरवून त्यांचा अपमान करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेस नेत्यांवर केला जात आहे. त्यातच प्रा. संजय मंडलिक यांच्यावर वैयक्तीक टिका केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. तर सोशल मीडीयावर शाहू महाराज यांच्या विषयी चुकीचे मॅसेज परवले जात असून त्याबद्दल तक्रार पोलीस अधिकक्षांकडे केली असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.
आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली, ते म्हणाले ” कोणत्याही पक्षाकडून विरोधक उमेदवारावर वैयक्तीक पातळीवर टिका करणे अपेक्षित नाही. आम्ही त्यासंदर्भातील सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पण शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चुकीचे मॅसेज पसरवले जात आहेत. आणि याची सुरवात ही विरोधी पक्षाकडून झाली आहे. मी याबाबत पोलीस अधिक्षकांशी बोललो असून तशी तक्रारही दाखल केली आहे.”असा खुलासाही त्यांनी केला.