कमला हॅरीस होणार उमेदवार ?

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी  अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत आता रंग भरु लागला आहे. ही निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होत आहे. तीन दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप तसेच विद्यमान अध्यक्ष आणि डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जोसेफ बायडेन यांच्यात प्रत्यक्ष वादविवादाची प्रथम फेरी झाली. या फेरीत ट्रंप यांची सरशी झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे डेमॉक्रेटिक पक्षाच्या […]

कमला हॅरीस होणार उमेदवार ?

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी 
अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत आता रंग भरु लागला आहे. ही निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होत आहे. तीन दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप तसेच विद्यमान अध्यक्ष आणि डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जोसेफ बायडेन यांच्यात प्रत्यक्ष वादविवादाची प्रथम फेरी झाली. या फेरीत ट्रंप यांची सरशी झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे डेमॉक्रेटिक पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण असून उमेदवार बदलण्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना या पक्षाची उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बायडेन यांनी उमेदवारीच्या सर्व प्राथमिक फेऱ्यांमध्ये विजय मिळविला आहे. मात्र, ते ट्रंप यांच्यासमोर टिकाव धरु शकतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बायडेन यांच्या प्रकृतीविषयीही बऱ्याच उलटसुलट चर्चा होत आहेत. त्यामुळे डेमॉव्रेटिक पक्ष नवा उमेदवार देण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अधिकृत दुजोरा नाही
मात्र, उमेदवार नवा देण्याच्या या वृत्ताला अद्याप डेमॉव्रेटिक पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष प्रकट चर्चेच्या आणगी दोन फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीत बायडेन मागे पडले असले तरी पुढच्या फेऱ्यांमध्ये त्यांना आपली परिस्थिती सुधारण्याची संधी आहे. त्यामुळे इतक्यात उमेदवार नव्या देण्यासाठी घाईगडबड करण्याचे कारण नाही. शिवाय वादविवादामध्ये मागे पडल्यामुळे बायडेन यांचा प्रत्यक्ष निवडणुकीत पराभवच होईल असे मानण्याचे कारण नाही, असेही या पक्षातील एका गटाला वाटत आहे. त्यामुळे उमेदवार नव्या देण्याच्या संदर्भात कोणता निर्णय होणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे, असेही अमेरिकेतील काही निवडणूक तज्ञांनी स्पष्ट केले.