जोकोव्हिच, मरे विम्बल्डनच्या ब्रॅकेटमध्ये

जोकोव्हिच, मरे विम्बल्डनच्या ब्रॅकेटमध्ये

वृत्तसंस्था/लंडन
सोमवारपासून येथे सुरू होणाऱ्या 2024 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनीस स्पर्धेत सर्बियाचा नाव्हॅक्ट जोकोव्हिच आणि ब्रिटनचा 37 वर्षीय अॅन्डी मरे या दुखापतग्रस्त टेनिसपटूंचा विम्बल्डनच्या साशंकतेच्या वर्तुळात समावेश आहे.
या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. दरम्यान जोकोव्हिचने गेल्या आठवड्यात या स्पर्धेसाठी सरावावर अधिक भर दिला होता. त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण आता त्याची स्थिती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. पण जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेसाठी पूर्ण तयारी केली असल्याचे सांगण्यात आले. जोकोव्हिचने आतापर्यंत 7 वेळा विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली असून त्याने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत विक्रमी 24 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. जोकोव्हिचचा या स्पर्धेत मंगळवारी सलामीचा सामना झेकच्या कोप्रिव्हाशी होणार आहे.
ब्रिटनचा अॅन्डी मरे याने यापूर्वी दोनवेळा विम्बल्डन ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धा जिंकली आहे. 37 वर्षीय मरेचा या स्पर्धेतील सलामीचा सामना सोमवारी झेक प्रजासत्ताकच्या टॉमस मॅकहेकशी होणार आहे. या स्पर्धेत अॅन्डी मरे आणि त्याचा भाऊ जेमी मरे यांना पुरूष दुहेरीसाठी वाईल्डकार्ड देण्यात आले होते. अॅन्डी मरे विम्बल्डन स्पर्धा आणि त्यानंतर होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेनंतर टेनिस क्षेत्रातून निवृत्त होण्याचे ठरविले आहे. पुरूष विभागात एकेरीच्या ड्रॉमध्ये इटलीचा जेनिक सिनेर, रशियाचा मेदव्हेदेव, विद्यमान विजेता स्पेनचा कार्लोस अल्कारेझ तसेच रुमानियाचा कास्पर रूड हे वरच्या ब्रॅकेटमध्ये तर जोकोव्हिच, हुरकेज, जर्मनीचा व्हेरेव्ह आणि रशियाचा रुबलेव्ह तळाच्या ब्रॅकेटमध्ये राहतील. सिनेर आणि अल्कारेझ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होण्याची शक्यता आहे.
महिलांच्या विभागात पोलंडची टॉपसिडेड इगा स्वायटेकला आतापर्यंत या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी पार करता आलेली नाही. स्वायटेकचा सलामीचा सामना सोफिया किनेनशी होणार आहे. 2020 साली किनेनने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. तर गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेत तिने अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव केला होता. या स्पर्धेत स्वायटेकला तिसऱ्या फेरीत कदाचित जर्मनीच्या केर्बेरशी मुकाबला करावा लागेल. इलिना रिबाकिना, जेसिका पेबुला यांचा वरच्या ब्रॅकेडमध्ये तर स्वायटेक, गॉफ, व्होंड्रोसोव्हा, पाओलिनी, साबालेंका आणि क्विनवेन हे तळाच्या ब्रेकेटमये आहेत. पुरूष एकेरीत स्पेनच्या अल्कारेझचा सलामीचा सामना लेजलशी होणार आहे. तर सिनेरची सलामीची लढत हेनफमनशी होईल.