अटकेतील धामणेच्या युवकाकडून साडेसात लाखांचे दागिने जप्त

अटकेतील धामणेच्या युवकाकडून साडेसात लाखांचे दागिने जप्त

फायनान्समध्ये गहाण ठेवून उचलली रक्कम
बेळगाव : चेनस्नॅचिंग प्रकरणी शहापूर पोलिसांनी अटक केलेल्या धामणे (ता. बेळगाव) येथील युवकाने शहापूर, टिळकवाडी, उद्यमबाग परिसरात चेनस्नॅचिंग केल्याचे उघडकीस आले असून त्याने फायनान्समध्ये ठेवलेले 103.430 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. प्रज्ज्वल जयपाल खानजी, रा. बस्तवाड रोड, धामणे असे त्याचे नाव आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु. यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, एस. एन. बसवा, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. आय. सनदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. प्रज्ज्वलने चेनस्नॅचिंगमधील दागिने मण्णपुरम्म फायनान्समध्ये गहाण ठेवले होते. त्याने 7 लाख 50 हजार रुपये किमतीचे 103.430 ग्रॅम दागिने गहाण ठेवले होते. हे सर्व दागिने बुधवारी पोलिसांनी जप्त केले असून संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईत संतोष पाटील, एस. एम. गुडदैवगोळ, नागराज ओसाप्पगोळ, सुरेश कांबळे, आनंद खोत, हणमंत विभुती, अमरनाथ दंडीन, गंगव्वा पार्वती आदींनी भाग घेतला.