बेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार असिफ ऊर्फ राजू सेठ यांनी नुकतेच तिरंगा कॉलनी येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी परिसराचा फेरफटका मारत समस्यांची माहिती करून घेतली. नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. तिरंगा कॉलनी परिसरात रस्ता, गटारी, सीडीवर्क, पिण्याचे पाणी यासह इतर सुविधांचा आमदारांनी आढावा घेतला. बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी नागरिकांची मते जाणून घेतली. मनपा अधिकाऱ्यांना सूचना करत समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यावेळी अमन सेठ तसेच लोकप्रतिनिधी व नगरसेवक उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी बेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार
बेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार असिफ ऊर्फ राजू सेठ यांनी नुकतेच तिरंगा कॉलनी येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी परिसराचा फेरफटका मारत समस्यांची माहिती करून घेतली. नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. तिरंगा कॉलनी परिसरात रस्ता, गटारी, सीडीवर्क, पिण्याचे पाणी यासह इतर सुविधांचा आमदारांनी आढावा […]