अनगोळच्या शेतकऱ्यांचे कोटूंमभाव येथे पावसासाठी गाऱ्हाणे

बेळगाव : अनगोळच्या शेतकऱ्यांनी चांगल्या पावसासाठी अनगोळ,येळ्ळूर शिवारातील कोटूंमभाव येथे  पावसासाठी देवाला गाऱ्हाणे घातले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावल्याने संपूर्ण शेतकरी बांधव मोठ्या पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पेरणी करूनही अद्याप म्हणावा तितका पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे पावसासाठी शेतकरी बांधवांनी देवाला गाऱ्हाणे मांडले. अनगोळ येथील रयत बांधवांनी सकाळी […]

अनगोळच्या शेतकऱ्यांचे कोटूंमभाव येथे पावसासाठी गाऱ्हाणे

बेळगाव : अनगोळच्या शेतकऱ्यांनी चांगल्या पावसासाठी अनगोळ,येळ्ळूर शिवारातील कोटूंमभाव येथे  पावसासाठी देवाला गाऱ्हाणे घातले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावल्याने संपूर्ण शेतकरी बांधव मोठ्या पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पेरणी करूनही अद्याप म्हणावा तितका पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे पावसासाठी शेतकरी बांधवांनी देवाला गाऱ्हाणे मांडले.
अनगोळ येथील रयत बांधवांनी सकाळी ग्रामदेवता कलमेश्वर मंदिर येथे देवाची विधिवत पूजा-अर्चा केली. देवाला घेऊन पालखी करलदंड मार्गाने अनगोळ, येळ्ळूर सीमेवरील कोटूंमभाव येथे निघाली. सकाळी राजहंसगडावरील मंदिरात जाऊन देवाला अभिषेक व नारळ वाहून पूजा केली. तेथील पाण्याने कोटूंमभाव येथील देवाला अभिषेक घालण्यात आला. देवाला गोड नैवेद्य दाखविला. यंदा चांगला पाऊस पडावा, गावात शांतता राहावी, जनावरांना चारा-आरोग्य लाभावे, गावातील शेतकरी, युवक, व्यावसायिक, कष्टकरी, कामगार, महिला यांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आली. यानंतर गावातील सर्व शेतकरी बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गावातील व्यापारी, शेतकरी, युवक, पंच कमिटी, देवस्की कमिटी तसेच हक्कदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.